रॉबिनसन डेव्हिड/ सांगली
सांगली जिल्ह्यातील कवलापूर येथील एसटीचे कंडक्टर राजेंद्र एन. पाटील (वय ४२) यांचे आज अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. सांगली एसटी आगारात पाटील हे कार्यरत होते. सध्या एसटीचा संप असल्याने ते घरीच होते. घरीच त्यांचा मृत्यू झाला आहे.
राजेंद्र पाटील हे एसटीत वाहक म्हणून कार्यरत होते. गेले काही दिवस एसटीचे आंदोलन सुरु आहे. सध्या संपामुळे चाके थांबली आहेत. त्यातच सरकारने कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे अनेक कर्मचारी चिंतेत आहे. त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र पाटील हेही तणावात होते. संपाबाबत त्यांनी सहकाऱ्यांशी बोलताना चिंता व्यक्त केली होती. त्यांच्या अचानक निधनाने कुटुंबीय आणि सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.