मुक्तपीठ टीम
मोमोज प्रेमींसाठी महत्वाची बातमी आहे. मोमोज खाल्ल्यानंतर दिल्लीतील एका ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. नवी दिल्लीस्थित ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) च्या फॉरेन्सिक तज्ज्ञांनी शवविच्छेदन तपासणीनंतर देशातील अशा प्रकारचे पहिले प्रकरण उघड केले आहे.ही घटना लक्षात घेत AIIMS च्या तज्ज्ञांनी घटनेची माहिती देत एक इशारा दिला आहे.
नेमकं काय घडलं?
- एम्सच्या फॉरेन्सिक रिपोर्टनुसार, मृत व्यक्तीचे वय ५० वर्षे होते.
- तो दारूच्या नशेत होता.
- हा व्यक्ती एका दुकानात मोमोज खात असताना तो अचानक जमिनीवर कोसळला.
- त्याचा जागेवर मृत्यू झाला.
- त्यानंतर या मृत व्यक्तीचे शवविच्छेदन करण्यात आले.
- एम्समधील पोस्टमॉर्टम कॉम्प्युटेड टोमोग्राफीमध्ये त्याच्या गळ्यात मोमोज अडकलेले आढळले.
- फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता म्हणाले, हे प्रकरण अत्यंत दुर्मिळ आहे, त्यातून धडा घ्यायला हवा.
विंड पाईपमध्ये अडकले होते मोमोज
- डॉ.अभिषेक यादव म्हणाले, एम्समध्ये अत्याधुनिक शवगृह आहे.
- शवविच्छेदनात मृताच्या विंडपाइपच्या अगदी सुरुवातीला डंपलिंगसारखा पदार्थ आढळून आला, तो मोमोज होता.
१२ लाखात एकाचा मृत्यू
- जेवताना श्वासनलिकेत अडथळा आल्याने अनपेक्षित मृत्यूची ही पहिलीच घटना नाही.
- जगात १२ लाख मृत्यूंपैकी एक मृत्यू जेवणादरम्यान श्वसनाच्या अडथळ्यामुळे होतो.
एम्सने दिला सल्ला…
- जेव्हा आपण अशी कोणतीही वस्तू खातो ज्याचा आकार मोठा असतो किंवा पोटात गेल्यानंतर तो पदार्थ फुलतो.
- असे पदार्थ भरपूर चावून खावीत.
- तज्ज्ञांनी सांगितले की, जर आपण चवल्याशिवाय काही खाल्ले तर ते पदार्थ अन्ननलिकेत अडकण्याची शक्यता असते.
- यामुळे श्वसन प्रणाली बाधित होऊन मृत्यू होऊ शकतो.
- त्यामुळे मोमोज असो किंवा इतर कोणतेही पदार्थ व्यवस्थित चावून खायला हवे.
- मोमेजच्या बाबतीत विशेष काळजी घेत हे पदार्थ खावे असा सल्ला AIIMS ने दिला आहे.