Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

डोंबिवलीत म्हाडाच्या अत्यल्प उत्पन्न गटासाठी बांधण्यात आलेल्या सदनिकांचे काम प्रगतीपथावर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 24, 2022
in सरकारी बातम्या
0
Mahada Low Cost Building Dombivali

मुक्तपीठ टीम

ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथील खोणी आणि शिरढोण गावात म्हाडाच्या अत्यल्प उत्पन्न गटासाठी बांधण्यात  येणा-या सदनिकांचे काम प्रगतीपथावर असून त्या लवकरच पूर्ण होत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.       

ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथील खोणी आणि शिरढोण गावात म्हाडाच्या अत्यल्प उत्पन्न गटासाठी बांधण्यात आलेल्या सदनिकांचा ताबा मिळण्याबाबत विधानसभा सदस्य कालिदास कोळंबकर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.                        

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथील खोणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ६ हजार ३३८ घरकुलांना केंद्रीय मान्यता व सनियंत्रण समितीने २८ एप्रिल २०१६ ला मान्यता दिली. प्रत्यक्ष जमिनीचा ताबा २० ऑक्टोबर २०१७ ला मिळाला. त्यानंतर  मंजूर अभ्यन्यासातील  १६ इमारतीतील ४ हजार ४४८ अत्यल्प उत्पन्न गटातील घरकुलांचे बांधकाम जानेवारी २०१८ पासून हाती घेण्यात आले. ॲडव्हान्स कॉन्ट्रीब्युशनची ही योजना असल्यामुळे या योजनेची लॉटरी काढण्यात आली आणि वेगवेगळया ट्प्प्यांवर त्याचे पैसे भरणे आवश्यक होते.  या सोडतीमध्ये यातील  यशस्वी १ हजार ४४६  लाभार्थींपैकी  २३८ लाभार्थींनी १०० टक्के रक्कम भरली १८७ लाभार्थींनी  पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम भरली. यातील आठ इमारती २०२४ या वर्षी पूर्ण होणार आहेत तसेच काही इमारतीना भोगवटा प्रमाणपत्र मिळाला आहे. शिरढोण येथील काही इमारती २०२२ मध्ये पूर्ण होतील. कोरोनाच्या काळात सर्व प्रकारची बांधकामे बंद असल्यामुळे ही कामे बंद होती. ही कामे आता सुरू असून लवकरच पूर्ण होतील अशी महिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.


Tags: DCM Devendra fadnavisdombivaliMaharashtramhadamumbaiउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसडोंबिवलीमहाराष्ट्रमुंबईम्हाडासदनिक काम
Previous Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शेतकऱ्यांना पत्राद्वारे भावनिक साद

Next Post

पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत उपाययोजना करणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

Next Post
Ravindra Chavan

पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत उपाययोजना करणार - सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!