Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मध्य आशियाई देशांतील तरुणांशी साधला संवाद

November 20, 2022
in घडलं-बिघडलं
0
DCM Devendra Fadnavis interaction with youth of Central Asian countries

मुक्तपीठ टीम

‘वसुधैव कुटुंबकम’ हीच भारताची भूमिका राहिली आहे. अशा या भारतातील आणि भारताच्या आर्थिक राजधानीतील मुंबईच्या कुटुंबात आपले स्वागत आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मध्य आशियाई देशांतील तरुण- तरुणींच्या शिष्टमंडळाचे स्वागत केले.

मध्य आशियाई देशांबरोबरील संबंधांना झालेली तीस वर्षे आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या देशांमधील तरुणांचा आदान- प्रदान सोहळा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे आयोजित करण्यात आला आहे. त्यानुसार मध्य आशियातील किरगिझस्तान, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान, कझाकस्तानमधील शंभरावर तरुण-तरुणी आज मुंबई शहराच्या भेटीवर आले होते. या शिष्टमंडळाने सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर कझाकिस्तानच्या अलबोल्सियन ओराकबायेवा, किरगिझिस्तानचे तालबेक बेरदेव, ताजिकिस्तानचे अलिशेर असलुद्दीन, उझबेकिस्तानचे आयस्लोम ओकुनोव्ह उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, भारत आणि मध्य आशियाई देशांमध्ये अनेक शतकांपासून राजनैतिक, व्यापार, सांस्कृतिक संबंध आहेत. या शिष्टमंडळाच्या भेटीमुळे हे संबंध आणखी दृढ होतील. भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. या अर्थव्यवस्थेत मुंबईसह महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. मुंबईची भारताच्या आर्थिक राजधानीबरोबरच मनोरंजन क्षेत्राची राजधानी म्हणूनही ओळख आहे. मुंबई शहर हे तरुणांच्या स्वप्नपूर्तीसाठी नेहमीच मदत करणारे शहर आहे.’

यावेळी शिष्टमंडळातील अलबोल्सियन ओराकबायेवा, तालबेक बेरदेव, अलिशेर असलुद्दीन, आयस्लोम ओकुनोव्ह यांनी मनोगत मांडले. त्यांनी सांगितले, की भारत सुंदर देश आहे. मध्य आशियाई देशांबरोबर भारताचे संबंध सौहार्दपूर्ण राहिले आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातील मध्य आशियाई देशांमधील सांस्कृतिक आदान- प्रदान, तरुणांच्या शिष्टमंडळाच्या भेटीचा उपक्रम कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे. भारत आणि मुंबई शहराची भेट आमच्या कायमच आठवणीत राहील. मुंबई शहर स्वप्नपूर्ती करणारे शहर आहे. ते बॉलिवूडमुळेही आमच्या परिचयाचे आहे. भारत आणि मुंबईला दिलेला भेटीचा अनुभव अनमोल राहील, असेही या तरुणांनी सांगितले.

भारत सरकारचे अवर सचिव रवीकुमार सिन्हा यांनी तरुणांच्या शिष्टमंडळाच्या दौऱ्याविषयी माहिती दिली. मुंबई शहरचे जिल्हा क्रीडाधिकारी अभय चव्हाण,  केंद्र सरकारमधील सहाय्यक कक्ष अधिकारी निरज पुजारी आदी उपस्थित होते. शिष्टमंडळ दोन दिवस मुंबई दौऱ्यावर राहणार असून ते विविध ऐतिहासिक, सांस्कृतिक स्थळांना भेट देणार आहेत.


Previous Post

उद्योजकांच्या समस्यांच्या निराकरणासासाठी कालबद्ध कार्यक्रम आखणीचे मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश

Next Post

एअर इंडिया विमानांमध्ये आता ‘टाटा टच’! इकॉनॉमी क्लासमध्येही जास्त सुविधा…

Next Post
Air India

एअर इंडिया विमानांमध्ये आता 'टाटा टच'! इकॉनॉमी क्लासमध्येही जास्त सुविधा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!