Saturday, March 14, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जरी आहे उपमुख्यमंत्री तरी…जिल्हा बँकेची सत्ताच न्यारी!

December 3, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
dcm ajit pawar is candidate for pune dc bank

मुक्तपीठ टीम

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक म्हणजेच पीडीसीसीची पंचवार्षिक निवडणूक येत्या दोन जानेवारीला होत आहे. २१ जागांकरिता ही निवडणूक होणार असून गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी २१ जणांनी ३१ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचाही समावेश आहे. त्यांनी बारामती तालुक्यातून अ वर्गातून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आजवर सातवेळा अध्यक्षपदी राहिलेले अजित पवार आता उपमुख्यमंत्री असतानाही आठव्यांदा अध्यक्षपदाच्या तयारीत आहेत. त्यामुळे राजकारणात जिल्हा बँक आणि त्यामाध्यमातून शिखर बँकेच्या सत्ता महत्वाची असल्याचे दिसून येते.

 

सातवेळा जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदावर अजित पवार

  • अजित पवारांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात जिल्हा बॅंकेतून केली होती.
  • आतापर्यंत त्यांनी सातवेळा जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाचा मान भुषवला आहे.
  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अ वर्ग, बारामती तालुक्यातून दोन उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल केले आहेत.
  • पहिल्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून सतीश हरिभाऊ तावरे, अनुमोदक म्हणून दिपक मलगुंडे दुसऱ्या उमेदवारी अर्जावर अमोल गावडे यांनी सूचक तर लालासाहेब मलावडे यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केलीय.

६ डिसेंबरला अर्ज भरण्याची शेवटी तारीख

  • पुणे जिल्हा बॅंक ही राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बॅंक आहे.
  • पीडीसीसीच्या संचालक मंडळातील २१ जागांकरिता दोन जानेवारीला मतदान होणार आहे.
  • तर, ४ जानेवारीला मतमोजणी आहे.
  • बॅंकेच्या २१ पैकी सर्वाधिक १३ जागा अ वर्ग मतदारसंघात आहेत.
  • एकेक जागा ब (पणन, प्रक्रिया), क (पतसंस्था, नागरी, बॅंका), ड (उर्वरित), एससीएसटी, एनटी, ओबीसी आणि महिला यांच्यासाठी आहे.
  • उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २९ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे.
  • त्याची मुदत ६ डिसेंबरपर्यंत आहे.
  • उमेदवारी अर्जांची छाननी ७ तारखेला होऊन दोन जानेवारीला मतदान होणार आहे.
  • उपमुख्यमंत्री अजित पवारांसह, शिरूरचे राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार यांचा समावेश आहे.
  • दरम्यान, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, खेडचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते आणि पुरंदरचे काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांनी अगोदरच उमेदवारी दाखल केलेली आहे.

Tags: ajit pawarpune dc bankअजित पवारपुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
Previous Post

सोयाबिन तेलाचा टँकर उलटला, गावकऱ्यांनी भांडी भरून घरी नेले!

Next Post

मुंबई आणि नवी मुंबईतल्या बिल्डर समूहावर आयकर छापे, शेकडो कोटींचा गैरव्यवहार!

Next Post
raid on mumbai navi mumbai builder group

मुंबई आणि नवी मुंबईतल्या बिल्डर समूहावर आयकर छापे, शेकडो कोटींचा गैरव्यवहार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!