मुक्तपीठ टीम
दिवसा ढवळ्या झोपल्यामुळे त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. तसेच, सध्या थंडीचे वातावरण आहे आणि दुपारी जेवल्यानंतर खूप झोप येते. पण दुपारची झोप आरोग्यासाठी चांगली नसते. असे अनेक लोक आहेत ज्यांना दुपारी झोपण्याची सवय असते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की आपल्याला दुपारच्या वेळी इतकी झोप का येते? झोपेबाबत असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात दिवसा झोपल्याने बद्धकोष्ठता, गॅस, अपचन इत्यादी पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. याशिवाय लठ्ठपणा, हृदयविकार, अल्झायमर, उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचाही धोका असतो. भर दिवसा झोपल्यामुळे दिनचार्या बिघडते. यामुळे रात्री झोप येत नाही. हृदयविकार, अल्झायमर आणि उच्च रक्तदाब यांसारख्या अनेक समस्या निर्माण होतात.
ज्या लोकांना दिवसा झोपण्याची सवय आहे त्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे आणि जर झोपायचेच असेल तर, २० ते ३० मिनिटे झोपू शकता. त्यापेक्षा जास्त झोपू नका.
दिवसा झोपल्यामुळे आरोग्यावर होणारे परिणाम कोणते?
१. लठ्ठपणा येणे
- जे लोक लठ्ठपणा किंवा वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी दिवसा झोपणे टाळावे.
- यामुळे या समस्या आणखी वाढू शकतात.
- दिवसा झोपल्याने झोपेतून जागे झाल्यानंतर थकवा आणि अस्वस्थता वाटू शकते.
२. हार्मोन्सवर होणारा परिणाम
- दिवसा झोपेचा आणखी एक तोटा म्हणजे त्याचा परिणाम माणसाच्या हार्मोनल आरोग्यावर होतो.
- दिवसा झोपल्यामुळे रात्रीची झोप नीट पूर्ण होत नाही, यामुळे हार्मोनल असंतुलन होते. तसेच, मूड खराब होतो आणि नैराश्य येते.
३. अपचन होणे
पाचक एंझाइम्सवर वाईट परिणाम होतो. अन्नाचे पचन नीट होत नाही.