Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर अभयारण्याची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा – वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

June 10, 2022
in सरकारी बातम्या
0
State Min Dattatray Bharane PWD Meeting 1

मुक्तपीठ टीम

सांगली जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्याला मजबूत कुंपण उभारणे, जल मृदसंधारण करणे, गवत कुरण विकास, वन वणवा नियंत्रण  ही कामे प्राधान्याने करून या क्षेत्रातील वन समस्यांबाबत स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करून तत्काळ कामे मार्गी लावावीत, असे निर्देश वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.            

मंत्रालयातील दालनात सांगली जिल्ह्यातील पलुस व कडेगाव वन विभागाच्या क्षेत्रातील समस्यासंदर्भात आयोजित बैठकीत राज्यमंत्री श्री. भरणे बोलत होते. यावेळी या बैठकीला आमदार अरुण लाड, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री.बेंझ, उपसचिव वने भानुदास पिंगळे, विभागीय वन अधिकारी विशाल माळी, किरण लाड, कुंडलिक ऐडके या बैठकीला उपस्थित होते.            

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्य हे महाराष्ट्रातील एकमेव असे मानव निर्मित अभयारण्य आहे. अभयारण्यातील वन विभागातंर्गत करता येतील अशी कामे स्थानिक ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घेवून पूर्ण करण्यात यावीत. या अभयारण्याला मजबूत कंपाउंड नसल्यामुळे या अभयारण्यातील प्राणी शेतीचे नुकसान करतात त्याचबरोबर प्राणी देखील दगावण्याच्या घटना घडतात अशा तक्रारी आहेत. अभयारण्याच्या विकासाबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे जी कामे करता येणे शक्य आहेत त्याचा तात्काळ प्रस्ताव बनवावा आणि ही कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत. या भागात अवैध वृक्षतोडी संदर्भातही वन विभागाने तत्काळ कारवाई करावी. सागरेश्वर अभयारण्य उत्कृष्ट पद्धतीने विकसीत करावे जेणेकरून या अभयारण्यामध्ये पर्यटन देखील वाढण्यास मदत होईल. या अभयारण्यासंदर्भात दहा दिवसाच्या आत केलेल्या कार्यवाहीची माहिती सादर करावी, अशा सूचना वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी बैठकीत दिल्या.             

आमदार अरुण लाड यांनी सागरेश्वर अभयारण्य विकसित करण्याबाबत वन विभागाने तातडीने पाऊले उचलावीत. तसेच या भागातील अवैध वृक्षतोड थांबवून सागरेश्वर अभयारण्यामध्ये हरणांकरिता चारा उपलब्ध करावा. सागरेश्वर अभयारण्य विकसित करताना स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेवून वन विभागाने कामे करावीत, अशा सूचना बैठकीत केल्या.


Tags: Dattatray bharaneMaharashtraSagreshwar Sanctuarysangliदत्तात्रय भरणेसागरेश्वर अभयारण्यसांगली
Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींची गुजरातला ३ हजार कोटींची ‘इलेक्शन गिफ्ट!’

Next Post

राज्यात ३०८१ नवे रुग्ण, १३२३ रुग्ण बरे! मुंबई १९५६, नाशिक ५, नागपूर १४ नवे रुग्ण !!

Next Post
maharashtra corona report

राज्यात ३०८१ नवे रुग्ण, १३२३ रुग्ण बरे! मुंबई १९५६, नाशिक ५, नागपूर १४ नवे रुग्ण !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!