मुक्तपीठ टीम
मजूर असल्याचं दाखवत मुंबई बँकेवर वर्षानुवर्षे निवडून येण्याची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याप्रकरणी प्रवीण दरेकरांची आज तीन तास पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आली. त्यानंतर बाहेर आल्यावर दरेकर यांनी त्यांच्याविरोधात गुन्ह्यासाठी सरकार, मुख्यमंत्री कार्यालयातून पोलिसांवर दबाव असल्याच्या आरोप केला.
मी पोलीस ठाण्यात गेलो. पोलिसांनी मला पत्र पाठवून बोलवलं होतं. तिथं मी काम करत असलेली मजूर संस्था आणि इतर विषयांवर चौकशी करण्यात आली. मात्र, या चौकशी दरम्यान चौकशी अधिकाऱ्यांना फोन येत होते. ते फोन सरकारमधील कुणीतरी, मुख्यमंत्री कार्यालय आणि पोलीस आयुक्तांकडून असण्याची शक्यता आहे. माझ्यावर कारवाईसाठी सरकारचा दबाव असल्याचे ते म्हणाले.
काय आहेत प्रवीण दरेकरांवर आरोप?
- विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे ‘मजूर’ असल्याचा खोटा दावा करत मुंबई बँक, हजारो ठेवीदार व सरकारची वर्षानुवर्षे फसवणूक करत आहेत .
- मुख्य म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात प्रवीण दरेकर हे बोगस मजूर असूनही मुंबई बँकेचे अध्यक्ष होते.
- २०१४-१५ ते २०१ ९- २० या काळात मुंबई बँकेत प्रवीण दरेकर व सहकाऱ्यांनी मोठा आर्थिक घोटाळा व नियम धाब्यावर बसवून काम केल्याचे सहकार विभागाच्या चौकशी अहवाल व चाचणी लेखापरीक्षण अहवालात स्पष्ट झाले आहे, असा आरोप आहे.