Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राष्ट्रीय जल पुरस्कार : कोकणाचो झेंडो फडकलो…दापोलीचा देशात दुसरा क्रमांक!

'सकाळ' समूहाच्या ‘ॲग्रोवन’ला जनजागरणासाठी सर्वोत्कृष्ट वृत्तपत्राचा पुरस्कार

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
National water Award

मुक्तपीठ टीम

केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी तिसऱ्या ‘राष्ट्रीय जल पुरस्कार-२०२०’ची घोषणा केली. या पुरस्कारांमध्ये रत्नागिरी जिल्हयातील दापोली नगर पंचायतीने देशात दुसरा क्रमांक पटकाविला असून  महाराष्ट्राला विविध श्रेणीत एकूण चार पुरस्कार जाहीर झाले आहेत.

 

जलसंपदा व्यवस्थापन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या प्रयत्नांची दखल घेण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी  केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने  विविध राज्ये, संस्था आणि व्यक्तींना ११ श्रेणींमध्ये एकूण ५७ पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात महाराष्ट्राला चार पुरस्कार जाहीर झाले . यावेळी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागाच्या सचिव विनी महाजन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. २०१८ पासून राष्ट्रीय जल पुरस्काराची सुरुवात झाली आहे.

दापोली नगर पंचायत आणि सुर्डी ग्रामपंचायत पुरस्कारांच्या मानकरी

सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक संस्थेच्या श्रेणीमध्ये देशातील सर्वोत्कृष्ट तीन संस्थांची निवड करण्यात आली असून यात रत्नागिरी जिल्हयातील दापोली नगर पंचायतीला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

 

सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीच्या श्रेणीमध्ये पश्चिम विभागातून निवड करण्यात आलेल्या तीन ग्रामपंचायतींमध्ये सोलापूर जिल्हयाच्या बार्शी तालुक्यातील सुर्डी  ग्रामपंचयातीने तिसरा क्रमांक पटकाविला आहे. जलव्यवस्थापनात उत्कृष्ट कार्यासाठी  देशातून तीन गैर शासकीय संस्थांची निवड करण्यात आली असून या श्रेणीत औरंगाबाद येथील ग्रामविकास संस्थेला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

 

जनतेमध्ये जलजागृतीकरिता उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशातील एक वृत्तपत्र आणि एका वृत्तवाहिनीचीही सर्वोत्कृष्ट माध्यम श्रेणीत निवड करण्यात आली असून सकाळ वृत्तपत्र समूहाच्या ‘ॲग्रोवन’ वृत्तपत्रास सर्वोत्कृष्ट वृत्तपत्राचा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार स्वरूप रोख रक्कम, प्रशस्तीपत्र आणि सन्मान चिन्ह प्रदान करण्यात येणार आहेत.


Tags: AgrovanBest Newspaper AwardDapoliJanajagaranKonkanmuktpeethNational water AwardSakal GroupUnion Water Power Minister Gajendrasinh ShekhawatWater Resources Management Areaकेंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावतकोकणजनजागरणजलसंपदा व्यवस्थापन क्षेत्रदापोलीदापोली नगर पंचायतराष्ट्रीय जल पुरस्कारसकाळ समूहसर्वोत्कृष्ट वृत्तपत्र पुरस्कारसुर्डी ग्रामपंचायत पुरस्कार मानकरीॲग्रोवन
Previous Post

ठिबक सिंचनासाठी शेतकऱ्यांना ७५ टक्के व ८० टक्के अनुदान! २०० कोटी रुपये निधी!!

Next Post

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला गती, भूसंपादनासाठी १२ गावांचे प्रस्ताव! जमिनीचे पहिले खरेदीखत!

Next Post
Pune-Nashik Semi High Speed Railway

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला गती, भूसंपादनासाठी १२ गावांचे प्रस्ताव! जमिनीचे पहिले खरेदीखत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!