Thursday, March 12, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

प्लास्टिक सर्जरी: कृत्रिम सौंदर्याचा हव्यास…करु शकतो जीवनाचा घात! कोणत्या सर्जरी आणि कोणते धोके?

May 18, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Plastic Surgery

मुक्तपीठ टीम

सध्याच्या काळात प्रत्येकाला सुंदर दिसायचं असतं. बहुतेक सर्वच आप-आपल्यापरीने सुंदर दिसण्यासाठी कॉस्मेटिक वस्तूंचा वापर करत असतात. सुंदर दिसण्यासाठी अनेक अभिनेत्री, मॉडेलच नाही तर राजकारणातील काही व्यक्ती कित्येक वेळा प्लास्टिक सर्जरी करत असतात. आपल्या शरीराच्या अवयवांना कृत्रिमरीत्या रेखीव आणि सुंदर बनवतात. मात्र ही शस्त्रक्रिया अपयशी झाली तर शरीरावर जीवघेणे घातक परिणाम होऊ शकतात. नुकताच एका अभिनेत्रीने अशा शस्त्रक्रियेदरम्यान जीव गमवला. त्यामुळेच प्लास्टिक सर्जरीमुळे कोणते धोके निर्माण होतात हे जाणून घेऊया…

सहा लोकप्रिय कॉस्मेटिक शस्त्रक्रिया

१. एब्डोमिनोप्लास्टी

ही शस्त्रक्रिया पोटाला योग्य आकारात आणण्यासाठी केली जाते. अतिरिक्त चरबी काढून आकार देण्याचा प्रयत्न केला जातो. गर्भधारणेनंतर, महिला पोटाला योग्य आकारात आणण्यासाठी ही शस्त्रक्रिया करतात. ज्यांच्या पोटावर जास्त चरबी नाही, पण त्वचा लटकलेली आहे, अशा लोकांवर ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. शस्त्रक्रियेनंतर रुग्ण दोन ते तीन आठवड्यांत सामान्य स्थितीत येतो.

धोका – औषधांच्या संसर्गाचा धोका असतो. तसेच काही वेळा पोटातही गुंतागुंतीच्या समस्या तयार होतात.

२. राइनोप्लास्टी 

ही शस्त्रक्रिया नाकाच्या सौंदर्यासाठी केली जाते. जेव्हा नाक सपाट किंवा सामान्यपेक्षा मोठे असते तेव्हा लोक या शस्त्रक्रियेचा अवलंब करतात. महिला सुंदर दिसण्यासाठी नाक टोकदार करतात. ही शस्त्रक्रिया काही तासांत केली जाते आणि एक ते दोन दिवसांत रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जातो.

धोका – यात जळजळ होण्याचा सर्वाधिक धोका असतो. याशिवाय इन्फेक्शनमुळे त्वचेचा रंगही बदलू शकतो. तसेच काहीवेळा नाकाचा आकार पुन्हा विचित्र होऊ शकतो.

३. लिपोसक्शन

याद्वारे पोट, मांडी, कंबर, हात, पाय यांवर शस्त्रक्रिया केली जाते. यामध्ये संबंधित भागाची चरबी काढून तिला योग्य आकार देण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचा सर्वात मोठा धोका म्हणजे जळजळ.

धोका – शस्त्रक्रियेनंतर अनेक महिने सूज टिकून राहते आणि त्वचा लोंबते.

४. ब्रेस्ट ऑग्मेंटेशन

म्हणजेच स्तनाला आकार देणे. अलीकडच्या काळात ही शस्त्रक्रिया करणाऱ्या महिलांची संख्या झपाट्याने वाढली आहे. स्तनाच्या आकार वाढवणे, स्तनाचा आकार कमी करणे आणि स्तन लोंबत असतील तर ते उंचावणे या शस्त्रक्रिया केल्या जातात. या शस्त्रक्रियांनंतर एक किंवा दोन आठवड्यांत सर्व काही सामान्य होते, सांगण्यात येतं.

धोका – यात सर्वात मोठा धोका म्हणजे शस्त्रक्रियेनंतर स्तनामध्ये गाठ तयार होऊ शकते. काही वेळा त्यांच्यात सूज येते. त्यासाठी वापरलेले साहित्य हलक्या दर्जाचे असेल तर ते लिकही होते. त्यातून भीषण समस्या उद्भवू शकतात.

५. ब्लेफेरोप्लास्टी

ही शस्त्रक्रिया भुवयांवर केली जाते. स्त्रिया त्यांच्या झुकलेल्या भुवया आकारात आणण्यासाठी शस्त्रक्रिया करतात. डोळ्याच्या जवळ असल्याने येथे धोका जास्त आहे. साधारणपणे १० ते १४ दिवसात सर्वकाही चांगले होते, असं सांगण्यात येतं.

धोका – शस्त्रक्रियेनंतर काही काळ सूर्यप्रकाश, धूळ आणि धूर टाळण्याचा सल्ला दिला जातो. पण त्याचा संसर्ग झाला तर त्रास होतो. तसेच डोळ्यांना वारंवार चोळल्याने संसर्ग होण्याचा धोका असतो.

६. रिटिडेक्टोमी

ही कॉस्मेटिक शस्त्रक्रिया वृद्धत्वाच्या सुरकुत्या काढून टाकण्यासाठी केली जाते. त्वचा घट्ट करून तरुण दिसण्याचा प्रयत्न केला जातो. कपाळ उंचावणे देखील कॉस्मेटिक सर्जरीचा एक प्रकार आहे, ज्यामध्ये कपाळावरील सुरकुत्या काढल्या जातात.

धोका – रुग्णाला सामान्य स्थितीत आणण्यासाठी काही आठवडे लागू शकतात. त्वचेवर जळजळ आणि संसर्ग हा सर्वात मोठा धोका आहे. जो कायमच असतो.

कॉस्मेटिक सर्जरी

चे धोके

  • कॉस्मेटिक सर्जरीमुळे तुम्ही सुंदर दिसाल, परंतु त्याचे धोकेही आहेत.अनेक वेळा अपेक्षित निकाल मिळत नाही.
  • स्नायू खराब होतात. शस्त्रक्रियेचे डाग आयुष्यभर राहू शकतात. शस्त्रक्रियेनंतर स्तनामध्ये नेहमीच वेदना होण्याची शक्यता असते.
    जर सर्जन अनुभवी नसतील तर अनेकदा शस्त्रक्रियेदरम्यान अतिरिक्त रक्तस्त्रावाची भीती असते.
  • सौंदर्य वाढवण्यासाठी केल्या जाणाऱ्या कॉस्मेटिक प्लास्टिक सर्जरीपैकी किमान एक टक्का प्रकरणांमध्ये एक मोठा धोका असतो. जिथं शस्त्रक्रिया केली जाते, शरीरावरील त्या ठिकाणी रक्तसंचय होऊन जणू काही रक्ताची पिशवीच तयार होते. या समस्येला हेमाटोमा म्हणतात.
  • आणखी एक प्रकारचा धोका म्हणजे सीरोमा. सीरोमा स्थिती उद्भवते जेव्हा सीरम किंवा शस्त्रक्रियेसाठी वापरले जाणारे द्रव त्वचेच्या पृष्ठभागाखाली येते. परिणामी, सूज आणि वेदना कायम राहतात. ही एक सामान्य गुंतागुंत आहे जी १५ ते ३० टक्के रुग्णांमध्ये दिसून येते.
  • शस्त्रक्रियेनंतर अनेक रुग्णांना अनेकदा गुंगीसारखे वाटते. हे पेशींच्या नुकसानीमुळे होते. याशिवाय रक्त गोठणे (विशेषतः पायांमध्ये) ही देखील एक गुंतागुंत आहे. याला वैद्यकीय भाषेत डीप वेन थ्रोम्बोसिस म्हणतात.

Tags: cosmetic plastic surgeryside effectsकॉस्मेटिक सर्जरीप्लास्टिक सर्जरीभारत
Previous Post

मुंबईच्या शिवडीत भेसळयुक्त चहा पावडरचा साठा जप्त! कशी ओळखाल चहातील भेसळ?

Next Post

औरंगाबाद विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे – उद्योग मंत्री सुभाष देसाई

Next Post
subhash desai lettr to AAI

औरंगाबाद विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे - उद्योग मंत्री सुभाष देसाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!