Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईच्या शिवडीत भेसळयुक्त चहा पावडरचा साठा जप्त! कशी ओळखाल चहातील भेसळ?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Tea

मुक्तपीठ टीम

बनावट पनीर कारखान्यांवरील धाडीचे प्रकरण ताजे असतानाच आता चहाशौकिनांसाठी धक्कादायक बातमी आहे. मुंबईत पोलिसांनी घातलेल्या धाडीत मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त चहा पावडरचा साठा आणि रंग जप्त करण्यात आले आहेत.
शिवडी परिसरातील एका व्यापाऱ्याकडून भेसळयुक्त चहा पावडर व खाद्यरंग या अन्न पदार्थांचा साठा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला माहिती विभागाने दिली आहे. या चहामुळे आरोग्यावर घातक परिणाम होत असतात. त्यामुळे ही भेसळ कशी ओळखावी ते जाणून घेणं महत्वाचं आहे.

शिवडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक हनमंत कुंभारे यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्या आधारे शिवडीच्या रामगड हटमेंटमधील आर एम ट्रेडर्सची त्यांनी तपासणी केली. तेथे त्यांना चहा पावडर या अन्नपदार्थास खाद्यरंग लावून विक्रीसाठी साठा केला असल्याचे आढळले. तसेच खाद्यरंग आढळून आला. हा साठा सकृतदर्शनी भेसळयुक्त असल्याच्या संशयावरून तेथून चहा पावडर व खाद्यरंग या अन्नपदार्थाचे अन्न नमुने घेण्यात आले. तसेच उर्वरित ४२९ किलोग्रॅमचा चहा पावडरचा साठा किंमत ८५ हजार २४० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. हे अन्न नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

संबंधित हजर व्यक्ती , पेढीमालक यांचे विरुद्ध शिवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त म.ना.चौधरी, सहाय्यक आयुक्त एस.एस.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी ल.सो.सावळे आणि र.ज.जेकटे केली आहे.

अशी ओळखावी भेसळ…

  • चहामधील भेसळ कशी ओळखावी, याबाबतची माहिती फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथोरिटी ऑफ इंडियाने (FSSAI) ट्विटद्वारे करून दिली आहे.
  • सर्वप्रथम एक फिल्टर पेपर घ्यायचा.
  • चहाची पावडर त्या फिल्टर पेपरवर पसरवून ठेवावी.
  • त्यावर थोडे पाणी शिंपडावं, जेणेकरून फिल्टर पेपर ओला होईल.
  • त्यानंतर फिल्टर पेपर पाण्याने धुवा.
  • या पेपरला चहा पावडरचा गडद डाग पडल्यास चहा पावडरमध्ये भेसळ असेल आणि जर पेपरला डाग पडला नाही किंवा ईगदी दलका डाग पडला तर त्यात भेसळ नाही हे सिद्ध होईल.

भेसळयुक्त चहा पावडरचे आरोग्यावर परिणाम!

  • भेसळयुक्त चहा प्यायल्याने तोंडाची चव खराब होते.
  • तसेच आरोग्यावर अनेक विपरीत परिणाम होत असतात.
  • यामुळे यकृताचे विकार होतात.
  • आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात.

Tags: adulterated tea powdermumbaiTeaचहाभेसळयुक्त चहा पावडरमुंबई
Previous Post

कोरोनामुळे छत्र हरपलेल्या ११ बालकांना ५ लाख रुपयांच्या मुदत ठेवींचे संरक्षण

Next Post

प्लास्टिक सर्जरी: कृत्रिम सौंदर्याचा हव्यास…करु शकतो जीवनाचा घात! कोणत्या सर्जरी आणि कोणते धोके?

Next Post
Plastic Surgery

प्लास्टिक सर्जरी: कृत्रिम सौंदर्याचा हव्यास...करु शकतो जीवनाचा घात! कोणत्या सर्जरी आणि कोणते धोके?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!