मुक्तपीठ टीम
गुजरातमधील सुरतमध्ये दिवाळीपूर्वी एक धक्कादायक घटना घडली आहे. दिवाळी हा सण, उत्सव आणि मनोरंजनाचा. परंतु या उत्सवात पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. गुजरातमधील सुरतमध्ये ५ मुले गटाराच्या मॅनहोलवर बसून फटाके फोडत होती. यावेळी गटारातून निघणाऱ्या गॅसने आग लागली आणि त्यांच्यावर आगीचा भडका उडाला.
तुळशी दर्शन सोसायटीतील गटाराच्या झाकणाच्या खालून गॅस लाइन काढण्यात आली आहे. या गॅस लाइनमधून गळती होत होती. मुलांनी फटाके फोडण्यासाठी आग लावली, तेव्हा खालून भडका निघाला आणि मुले त्या जाळ्यात अडकली. ही घटना एका घरात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सुदैवाने मुलांना गंभीर दुखापत झाली नाही.
खोदकाम सुरू असल्यामुळे गॅसची झाली गळती
- सोसायटीत ग्राउंड गॅस पाइपलाइनचे काम सुरू आहे.
- या दरम्यान, गल्ली क्रमांक-७ जवळ एका मशिनमुळे पाईपलाईन खराब झाली.
- त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. याच दरम्यान गटाराच्या झाकणावर फटाके ठेवून मुले खेळू लागली.
- येथे गॅसचा साठा होता, त्याला आग लागली.
- याठिकाणी कमी प्रमाणात गॅस असल्यामुळे आग लवकर विझवण्यात आली.
अपघातानंतर मुलांना रुग्णालयात नेले
- अपघातानंतर सर्व मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
- सुदैवाने, एकाही मुलाला गंभीर दुखापत झालेली नाही आहे.
- काही मुलांना हात आणि पायांना हलक्या जखमा झाल्या आहेत अश्या तक्रारी होत्या. त्यावर उपचार झाले.
- काही मुलांचे केसही जळाले, पण कोणाच्याही चेहऱ्यावर जखमा नाहीत.