मुक्तपीठ टीम
इंटरनेटचा वापर जितका वाढतोय तेवढीच हॅकर्सची दहशतही वाढत आहे. त्यातच आता इंटरनेटचा वापर पीसी-लॅपटॉपपेक्षा हातातील स्मार्टफोनने जास्त वाढत असल्यामुळे हॅकिंगचा हा धोकाही थेट आपल्या हातूनच ओढवण्याची भीतीही वाढतेय. स्मार्टफोननेच आर्थिक व्यवहारही वाढत असल्याने ऑनलाइन फसवणुकीचे नवनवीन प्रकारही वाढत आहेत. अशा परिस्थितीत स्मार्टफोन युजर्सने सावध राहण्याची गरज आहे. नाही तर युजर्स हॅकिंगचे सहजच बळी पडू शकतात. नेमक्या कोणत्या चुका आपण टाळाव्यात याचा वेध.
फोनला वेळोवेळी अपडेट करणे आवश्यक!
- नव नवीन फिचर्स वापरायला पाहिजे परंतु फोनला उपडेट करायला कंटाळा जातो.
- जर फोने अपडेटेड नसेल तर नवीन फिचर्स वापरणे देखील अशक्य असते.
- त्यामुळे न विसरता, आळस न करता फोन वेळोवेळी अपडेट करणे गरजेचे.
- कारण स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपन्या नवीन सायबर हल्ले टाळण्यासाठी सुरक्षा अपडेट आणतात.
- सॉफ्टवेअर अपडेट्ससाठी, फोनच्या सेटिंग्जच्या सॉफ्टवेअर अपडेटवर क्लिक करून नवीन अपडेट्सची माहिती मिळवू शकता.
- फोनला सायबर हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी ही पहिली पायरी आहे.
पासवर्ड प्रोटेक्शन नेहमी चालू ठेवा!
- फोन सुरक्षेसाठी फोनमध्ये पासवर्ड प्रोटेक्शन नेहमी चालू ठेवणे आवश्यक आहे.
- फोनसाठी पॅटर्न लॉक, वैयक्तिक पिन किंवा वर्णमाला-संख्यात्मक पासवर्ड निवडता येतो. सहज लक्षात ठेवता येईल असा स्मार्ट पासवर्ड निवडा, ज्याचा अंदाज लावणे हॅकर्सना कठीण असेल.
- फोन लॉक होण्यासाठी लागणारा वेळही किमान सेट करू शकता.
एपीके फाइल वापरू नये
नेहमी गुगल प्ले स्टोर वरून अॅप्स डाउनलोड करा.
अनेक अॅप्स गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध नसतात ते फक्त एपीके फाइलद्वारे इंस्टॉल केले तर धोकादायक ठरू शकते.
नेहमी टर्म आणि कंडिशन वाचा
अॅप डाऊनलोड करताना संपर्क यादी, माईक आणि गॅलरी अॅक्सेस करण्यासाठी सांगितले जाते, त्यासीठी अॅप्स डाउनलोड करताना नेहमी नियम आणि अटी वाचण्याची सवय लावा.
फक्त विश्वसनीय अॅप्स इंस्टॉल करा
स्मार्टफोन युजर्सने नेहमी विश्वसनीय अॅप्स डाउनलोड करावेत. थर्ड पार्टी अॅप्स डाउनलोड करणे टाळा.
हे अॅप्स गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअर वरून डाउनलोड केले पाहिजेत.
ब्लूटूथ, जीपीएस, वायफाय गरज नसताना बंद ठेवा
गरज नसेल्यास फोनचे ब्लूटूथ, जीपीएस आणि वाय-फाय सेवा नेहमी बंद ठेवावी.
या फीचर्समुळे हॅकर्स फोन सहज हॅक करू शकतात.
त्यामुळे गरज असल्याशिवाय बंद ठेवा.
वाय-फाय वापरताय तर काळजी घ्या
- सार्वजनिक वाय-फाय वापरणे टाळा.
- शा वाय-फाय कनेक्शनसह ऑनलाइन बँकिंगमध्ये प्रवेश करू नका.
- रेल्वे स्टेशन, बस स्थानक, पार्क, मॉल मध्ये मोफत वाय-फाय उपलब्ध आहे.
- ते बँकिंग व्यवहारासाठी अजिबात वापरू नका.
जुने अॅप्स करा अन-इंस्टॉल
- युजर्सनी नेहमी जुने आणि अनावश्यक अॅप्स अनइंस्टॉल करावेत.
- जुने अॅप्स फोनचे स्टोरेज भरण्याचे काम करतातच, पण फोनच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरु शकतात.