मुक्तपीठ टीम
काही दिवसांपूर्वी मेटाव्हर्समध्ये संपन्न झालेल्या एका खऱ्या लग्नाच्या आभासी रिसेप्शनची बातमी मुक्तपीठवर तुम्ही वाचली असेल. आता मेटाव्हर्सच्या या जगात एका भारतीय गायकानं आपली म्युझिक कॉन्सर्ट रंगवली आहे. हा गायक आहे लोकप्रिय पंजाबी गायक दलेर मेहंदी! मेटाव्हर्समध्ये परफॉर्म करणारे ते जगातील तिसरे आणि पहिले भारतीय गायक आहेत. दलेर मेहंदीने ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त हा परफॉर्मन्स दिला आहे. यापूर्वी जस्टिन बीबर आणि ट्रॅव्हिस स्कॉट या आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी मेटाव्हर्समध्ये परफॉर्म केले आहे.
दलेर मेहंदीच्या मेटाव्हर्स कॉन्सर्टमध्ये २ कोटी रसिक!
- दलेर मेहंदीने इंस्टाग्रामवर पोस्ट करून आपल्या मेटाव्हर्स कॉन्सर्टचं निमंत्रण दिलं होतं.
- पण जेव्हा १५ लाख लोक एकत्र आले तेव्हा सर्व्हर क्रॅश झाला.
- सर्व्हर ठिक झाल्यावर दलेर मेहंदी आपल्या शैलीत धमाल गायला आणि त्याच्या कॉन्सर्टचा आनंद तब्बल दोन कोटी रसिकांनी लुटला.
- दलेर मेहंदीने मेटावर्समध्ये नमो-नमो, इंडिया-इंडिया आणि जागो इंडिया अशी सदाबहार हिट गाणी सादर केली.
- दलेर मेहंदी म्हणाला की, तो स्वत:ला भाग्यवान समजतात की, त्याला भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.
- दलेर मेहंदीने व्हिडीओ शेअर करून सर्व चाहत्यांचे आभार मानले.
आभासी जगाची वाढती क्रेझ
- आधुनिक जगात मेटाव्हर्स हा नवा ट्रेंड बनत आहे.
- आभासी जगाची वाढती क्रेझ पाहता दलेर मेहंदीने मेटावर्समध्ये परफॉर्म केले.
- दलेर मेहंदी मेटावर्समध्ये परफॉर्म करणारा पहिला भारतीय गायक ठरला आहे.
भारताचे स्वतःचे मेटाव्हर्स
- भारतातील पहिल्या मेटाव्हर्स कॉन्सर्टचे आयोजन प्रजासत्ताक दिनानिमित्त करण्यात आले होते.
- याबाबतचे पोस्टरही त्यांनी शेअर केले.
- हा परफॉर्मन्स पार्टी नाईटमध्ये झाला.
- पार्टी नाइटला भारताचे स्वतःचे मेटाव्हर्स म्हटले जाते.
- तेथे यूजर्स अवतार तयार करू शकतात, गेम खेळू शकतात आणि एनएफटी कमावू शकतात.
- मेटाव्हर्स वेबसाइटवर नोंदवलेल्या माहितीनुसार, पार्टी नाईट हे ‘डिजिटल समांतर विश्व’ आहे, जे ब्लॉकचेनवर चालते.