मुक्तपीठ टीम
प्रख्यात उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा रविवारी संध्याकाळी मुंबईजवळ एका रस्ते अपघातात मृत्यू झाला.त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर पोलिसांनी कार निर्मात्यांना अनेक प्रश्न विचारले आहेत. अपघाताच्या वेळी एसयूव्हीच्या एअरबॅग का उघडल्या नाहीत, वाहनात काही यांत्रिक बिघाड होता का? कारचा ब्रेक फ्लुइड काय होता? एक नाही अनेक प्रश्न आणि वेगाविषयीच्या काही प्रश्नांची उत्तरं पोलिसांनी कार कंपनीकडे मागितली आहेत. जर्मनीत पाठवण्यात येणारी डेटा रेकॉर्डर चीप या प्रश्नांची योग्य उत्तर देण्याची शक्यता आहे.
एक अपघात अनेक प्रश्न!
- प्रवासादरम्यान सायरस मिस्त्री आणि सहप्रवाशी कुठेतरी थांबले होते की मध्येच ते खूप वेगाने जात होते?
- अपघाताच्या वेळी एसयूव्हीच्या एअरबॅग का उघडल्या नाहीत?
- कारमध्ये काही यांत्रिक बिघाड होता का?
- कारचा ब्रेक फ्लुइड किती होता?
- एवढी सुरक्षा व्यवस्था असणाऱ्या कारमध्ये मागच्या सीटवरील प्रवाशांचे बळी सेफ्टी बेल्ट लावला नसेल तर रोखण्यासाठी काही यंत्रणा नसते का?
कारमधील डेटा रेकॉर्डर चिप जर्मनीला पाठवणार!
- कारची डेटा रेकॉर्डर चिप डीकोडिंगसाठी जर्मनीला पाठवली जाईल.
- जर्मनीहून डीकोड केल्यानंतर एसयूव्हीची संपूर्ण माहिती पोलिसांना दिली जाईल.
- या प्रक्रियेस अनेक दिवस लागू शकतात.
- या डेटा रेकॉर्डरमध्ये वाहनाची तपशीलवार माहिती मिळेल.
- ब्रेक्स, एअर बॅग्ज आणि इतर मशिनरी कशी काम करत आहेत याची माहिती मिळणार होती.
- अपघाताच्या वेळी गाडीचा वेगही कळेल.