Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘त्या’ IAS-IPS अधिकाऱ्यांबद्दल CVCची कडक भूमिका! केंद्रात विशिष्ट पदांसाठी नाही मिळणार मान्यता!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
cvc

मुक्तपीठ टीम

IAS-IPS सेवेतील अधिकारी म्हणजे सर्वश्रेष्ठ असाच समज असतो. त्यांच्यातील अनेकांचा तोराही तसाच असतो. पण काहींची स्थावर मालमत्ता भलतीच जास्त होते. ती ते लपवू पाहतात. पण आता अशा अधिकाऱ्यांना केंद्रीय दक्षता आयोग म्हणजेच CVCने इशारा दिला आहे. अशा अधिकाऱ्यांना भारत सरकारमधील वरिष्ठ पदांच्या पॅनेलमध्ये सामील होण्यासाठी CVC ची मंजुरी मिळणार नाही. त्यामुळे स्वाभाविकच त्या पदांवर नियुक्तीच शक्य नसेल.

 

केंद्रीय दक्षता आयोग ‘सीव्हीसी’ ने आयएएस आणि आयपीएससह इतर अखिल भारतीय सेवांच्या अधिकाऱ्यांना वार्षिक स्थावर मालमत्ता परतावा (AIPR) बाबत इशारा दिला आहे. आयोगाचे म्हणणे आहे की, जर या अधिकाऱ्यांनी आपला एआयपीआर वेळेवर जमा करत नाही तर त्यांना भारत सरकारमधील वरिष्ठ पदांच्या पॅनेलमध्ये सामील होण्यासाठी CVC ची मंजुरी मिळणार नाही. एआयपीआर वेळेवर दाखल करणे ही दक्षता मंजुरीसाठी आवश्यक पूर्व अट असल्याने, भारत सरकारच्या सर्व मंत्रालये आणि विभागांना विनंती करण्यात आली आहे की ज्या अधिकाऱ्यांसाठी आयोगाकडून दक्षता इनपुट मागितले गेले आहे, त्यांचे एआयपीआर वेळेवर सादर केले जावे.

 

३१ जानेवारीपर्यंत एआयपीआर सादर करणे…

  • अखिल भारतीय सेवांच्या सर्व अधिकाऱ्यांना दरवर्षी ३१ जानेवारीपर्यंत एआयपीआर सादर करणे आवश्यक आहे.
  • अनेक अधिकारी निर्धारित तारखेला एआयपीआर सादर करत नसल्याचे दिसून आले आहे.
  • यामुळे अडचण काय होते ते समजून घेणे महत्वाचे आहे.
  • अशा एखाद्या अधिकाऱ्याचे नाव भारत सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी सीव्हीसीकडे पाठवल्यावर एआयपीआर मिळत नाही.
  • हे सीव्हीसी,डीओपीटी आणि संबंधित मंत्रालय किंवा विभाग यांच्याशी पत्रव्यवहार केला जातो.
  • या प्रक्रियेमुळे इतर अधिकाऱ्यांची नामांकन यादी प्रसिद्ध होण्यासही विलंब होतो.

 

कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग ‘डीओपीटी’ द्वारे २७.०९.११ रोजी यासंबंधित कार्यालयिन आदेश जारी केला होता. त्यात असे लिहिले आहे की, केंद्रीय नागरी सेवा/पदांवर कार्यरत असलेल्या सदस्यांना वार्षिक स्थावर मालमत्ता विवरणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. जर ते तसे करण्यात अयशस्वी झाले तर त्यांना सीव्हीसीची मान्यता मिळणार नाही. आता गेल्या आठवड्यात सीव्हीसीने पुन्हा आदेश जारी केले आहेत. यामध्ये नमूद करण्यात आले आहे की, सर्व अधिकाऱ्यांना निर्धारित मुदतीत एआयपीआर सादर करावा लागेल.
त्यांनी तसे न केल्यास त्यांना दक्षता परवानगी नाकारली जाईल. भारत सरकारमधील वरिष्ठ स्तरावरील पदांसाठी त्यांचा विचार केला जाणार नाही.


Tags: AIPRCVCIAS-IPSआयएएस-आयपीएसकेंद्रीय दक्षता आयोग
Previous Post

सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी – जितेंद्र आव्हाड

Next Post

टेंभापुरी मध्यम प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांसंदर्भात लवकरच बैठक – जयंत पाटील

Next Post
Jayant patil..

टेंभापुरी मध्यम प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांसंदर्भात लवकरच बैठक - जयंत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!