Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आरोपींच्या सोयीसाठी फौजदारी खटला दुसऱ्या राज्यात वर्ग करणे शक्य नाही: सर्वोच्च न्यायालय

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
supreme court 2

मुक्तपीठ टीम

सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. आरोपींच्या सोयीच्या आधारे फौजदारी खटला एका राज्यातून दुसर्‍या राज्याच्या न्यायालयात वर्ग केला जाऊ शकत नाही. केवळ मोठं अंतर पार करावं लागतं, या मुद्द्यावर एका न्यायालयातून दुसऱ्या न्यायालयात खटले स्थानांतरित केले तर फौजदारी दंड संहितेतील न्यायालयाच्या क्षेत्राधिकाराची तरतूदच निरर्थक ठरेल, असे सर्वोच्च न्यायालयानं म्हटले आहे. तसेच, जोपर्यंत कायद्याच्या दिशानिर्देशांचा संबंध आहे, तेथे सोयीचा आणि गैरसोयीचा काही अर्थ नाही, असेही बजावले आहे.

 

न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठाने हा निकाल नुकताच दिला. तामिळनाडूच्या सालेम येथून एक खटला दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यालायालयात स्थानांतरित करण्यासाठी फौजदारी दंड संहिता म्हणजेच सीआरपीसीच्या कलम ४०६ अन्वये आरोपींची स्थानांतरण याचिका फेटाळताना दिला.

 

भाषेच्या समस्येच्या आधारे खटला हस्तांतरित करणे शक्य नाही!

  • न्यायालयाने म्हटले आहे की, जेव्हा खटला दाखल केला जातो तेव्हा आरोपी किंवा तक्रारदाराला राज्यभर प्रवास करावा लागतो आणि खटल्याच्या प्रक्रियेत सामील होण्यासाठी प्रादेशिक प्राधिकरणाच्या न्यायालयात जावे लागते.
  • या प्रकरणात आरोपीने म्हटले होते की, त्याला तमिळ भाषा समजत नाही, म्हणून त्याचा खटला दिल्लीला पाठवावा.
  • कलम ४०६ अन्वये खटला फक्त तेव्हाच हस्तांतरित केला जातो जेव्हा न्याय मिळवायचा असेल आणि त्या राज्यात न्याय मिळणे शक्य नसते.
  • आरोपी आणि तक्रारदार संबंधित आहेत.
  • न्यायालयाने म्हटले आहे की, या प्रकरणातील आरोपी आणि तक्रारदार एकमेकांचे संबंधित आहेत आणि त्यांनी त्यांच्या सोयीनुसार दिल्ली आणि तामिळनाडूमध्ये पेटंटसाठी दिवाणी दावा दाखल केला आहे.
  • परंतु आता आरोपी एका गुन्हेगारी खटल्याला दोन हजार किमीच्या अंतराचे कारण सांगत स्थानांतरित करण्याची मागणी करत आहे.

 

खटला स्थानांतरित करण्याचा अधिकार

  • कलम ४०६ अन्वये, खटला एका राज्यातून दुसर्‍या राज्यात स्थानांतरित करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे.
  • तर राज्यभरात संबंधित उच्च न्यायालयाला हा खटला एका सत्र न्यायालयातून दुसर्‍या सत्र न्यायालयात पाठविण्याचा अधिकार आहे.

Tags: criminal casehigh courtSupreme Courtउच्च न्यायालयफौजदारी खटसर्वोच्च न्यायालय
Previous Post

#व्हाअभिव्यक्त ’शिक्षणसेवक’ तुषारला मृत्यूनंतर तरी न्याय मिळणार?

Next Post

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून लहानग्यांना कसं वाचवाल?

Next Post
kids

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून लहानग्यांना कसं वाचवाल?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!