Thursday, October 1, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वडाळा येथे गुन्हे शाखेची कारवाई; १४ लाखांचा ड्रग्ज जप्त

एमडी आणि गांजा विक्री करणार्‍या दोन आरोपींना अटक

January 17, 2021
in कायदा-पोलीस
0
act

मुक्तपीठ टीम

 

वडाळा परिसरात एमडी आणि गांजा विक्री करणार्‍या दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या अधिकार्‍यांनी अटक केली. मोहम्मद इक्बाल अब्दुल हमीद मेमन आणि जमीर अहमद अब्दुल खलिक अन्सारी अशी या दोघांची नावे असून ते दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत, त्यांच्याविरुद्ध आग्रीपाडा आणि नागपाडा पोलीस ठाण्यात चार गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे चौदा लाख रुपयांचा एमडी आणि गांजाचा साठा जप्त केल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांनी सांगितले.

 

अटकेनंतर त्यांना स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबई शहरात गेल्या काही महिन्यांत ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध विशेष मोहीम सुरु करण्याचे आदेश वरिष्ठांनी ऍण्टी नारकोटीक्स सेल, गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांना दिले होते. या आदेशानंतर गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अशा ड्रग्ज तस्कराची माहिती काढण्यास सुरुवात केली होती. याच दरम्यान शिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडाळा येथील दारुखाना रोड, उडीपी हॉटेलजवळ काहीजण एमडी आणि गांजाची डिलीव्हरीसाठी येणार असल्याची माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांना मिळाली होती. या माहितीनंतर सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, अतिरिक्त पोलीस आयुक्त विरेश प्रभू, पोलीस उपायुक्त प्रकाश जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक निनाद सावंत, संजय निकम, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कृष्णा नार्वेकर, पोलीस हवालदार सदानंद परब, संदीप कांबळे, पोलीस नाईक संदीप तळेकर, अजय बल्लाळ, पोलीस शिपाई अनुपम जगताप, पोलीस शिपाई चालक लखन चव्हाण यांनी शुक्रवारी सकाळी उडीपी हॉटेलजवळ साध्या वेशात पाहत ठेवली होती. यावेळी तिथे आलेल्या मोहम्मद इक्बाल आणि जमीर अन्सारी या दोन संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.

आरोपीयांची अंगझडती घेतल्यानंतर पोलिसांना त्यांच्याकडे १३ लाख ५० हजार रुपयांचे १३५ एमडी आणि ४५ हजार रुपयांचा १ किलो ८५० ग्रॅम वजनाचे गांजा सापडला. त्यांच्याविरुद्ध शिवडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता, गुन्हा दाखल होताच या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यांचा तपास युनिट चारचे अधिकारी करीत आहेत. तपासात ते दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत, त्यांच्याविरुद्ध नागपाडा आणि आग्रीपाडा पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल असल्याचे पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांनी सांगितले.


Tags: crime branchDrugsdrugs seizedWadalaड्रग्ज जप्तवडाळा
Previous Post

सोलापूर-उजनी समांतर पाणी पुरवठा योजना, उड्डाणपूल प्रकल्प भूसंपादनाअभावी रखडू देणार नाही

Next Post

शरीर तंदुरुस्त राखायचं आहे?…मग ‘WHO’ चे ऐका!

Next Post
Health fitness

शरीर तंदुरुस्त राखायचं आहे?...मग ‘WHO’ चे ऐका!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!