गुन्हे महत्वाचे: 1)मालाड कुरार परिसरात गांजाची तस्करी करणाऱ्या एका सिव्हिल इंजिनिअरला अटक करण्यात आली. या व्यक्तीकडून 63 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांना छाप्यात गांजाच्या तीन गोण्या मिळाल्या.बाजारपेठेत या गांजाची किंमत जवळपास ९ लाख इतकी आहे. 2)सोलापूर शहर पोलीस दलातील एका महिला कॉन्स्टेबलचा संशयास्पद मृत्यू झालाय. एका बस स्थानकावर त्यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडालीय. मृत महिलेच्या पतीने पत्नीचे एका पोलीस उपनिरिक्षकासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करत त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचा दावा केलाय. दुसरीकडे पोलिसांनी मात्र याबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे महिला कॉन्स्टेबलच्या मृत्यूमागील कारण अस्पष्ट आहे. त्यामुळेच ही आत्महत्या आहे की हत्या असा प्रश्न उपस्थित होतोय. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तपासातच त्यांच्या मृत्यूमागील खरं कारण समजू शकणार आहे. 3) मागील काही वर्षांमध्ये मुलांच्या आरोग्याचा प्रश्न गांभीर्याने हाताळला गेला नसल्याचे दिसून आले आहे. मागील सात वर्षांत राज्यात एक लाख ३८ हजार बालकांनी प्राण गमावले आहेत. कुटुंबकल्याण, माता बाल संगोपन विभागाने दिलेल्या माहितीनुसार २०१४-१५ ते २०२०-२१ या सात वर्षांच्या कालावधीमध्ये राज्यातील ० ते ५ या वयोगटातील एक लाख ३८ हजार ५७ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 4)टीआरपी घोटाळ्यात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी मोठी कारवाई केली. त्याअंतर्गत तब्बल ३२ कोटी रुपयांची मालमत्ता चार शहरांमधून जप्त करण्यात आली आहे. तीन वाहिन्यांच्या मालमत्तेचा त्यात समावेश आहे. 5)वसईच्या उच्चभ्रू वस्तीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. एनजीओच्या नावाखाली हे सेक्स रॅकेट चालवले जायचे. याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली असून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.