Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आदिवासी दिनी आदिवासींच्या प्रश्नांवर माकप आक्रमक, तहसिलचे गेट तोडत केला बेमुदत सत्याग्रह!

August 9, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
tribes issues

मुक्तपीठ टीम

रेशन, रोजगार, शिक्षण व वेतनाच्या मूलभूत मागण्यांकडे दुर्लक्ष करत आदिवासी दिनाच्या निमित्ताने तालुक्यात जातीयवादी राजकारण सुरू असताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व जनसंघटनांनी आदिवासी व श्रमिकांच्या मूलभूत प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली आहे. तालुक्यात सुरू असलेल्या जातीयवादी राजकारणाला जोरदार चपराक देत माकप ने तहसील कार्यालयाचे गेट तोडत बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

 

आंदोलनाच्या निमित्ताने उपस्थित केलेल्या मागण्यांची प्रशासनाने तड न लावल्यास ११ ऑगस्ट रोजी भव्य मोर्चा काढून तहसील कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशाराही माकपने दिला आहे.

 

आदिवासी दिनाच्या निमित्ताने आदिवासींच्या भावनांशी खेळायचे आणि नंतर आदिवासींच्या मूलभूत प्रश्नांकडे अक्षम्य दुर्लक्ष करायचे अशी संतापजनक परिस्थिती सध्या तालुक्यात दिसते आहे. रेशनचा काळाबाजार करून आदिवासींच्या अन्नात माती कालवायची, आदिवासींना जंगलच्या जमिनीवर अधिकार नाकारायचे, बांधकाम कामगार, अर्धवेळ परिचर, आशा कर्मचारी, घरेलू कामगार, अंगणवाडी कर्मचारी, विधवा, परित्यक्ता व निराधार वृद्धांना शासकीय योजना, वेतन व सामाजिक सुरक्षेपासून वंचित ठेवायचे. शासन व प्रशासनाचे हे अन्यायकारक उद्योग मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सहन करणार नाही, असा इशारा यावेळी माकपने दिला आहे.

 

तहसील कार्यालयासमोर आदिवासी, कामगार, कर्मचारी, निराधार व शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी दोनशे श्रमिकांनी आंदोलन सुरू केले असताना आंदोलनाकडे दुर्लक्ष करून तहसील कार्यालयातील संबंधित अधिकारी भंडारदरा येथे एका खाजगी कार्यक्रमाला निघून गेले. आदिवासी व श्रमिकांच्या आंदोलनाची ही उपेक्षा लाल बावटा खपवून घेणार नाही अशी भूमिका घेत आंदोलनकर्त्यांनी यावेळी तहसिलचे गेट तोडत कार्यालयात धडक दिली. तहसील कार्यालयात प्रचंड घोषणा देत प्रशासनाच्या या कृतीचा तीव्र धिक्कार व्यक्त केला. आंदोलकांच्या आक्रमक पावित्र्यामुळे प्रशासनाची त्रेधा उडाली. आंदोलकांनी पहिल्याच दिवशी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे आंदोलनात उपस्थित केलेल्या मागण्या धसास लावल्या शिवाय आंदोलक माघार घेणार नाहीत हे आता स्पष्ट झाले आहे.

 

डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, जुबेदा मणियार, आराधना बोऱ्हाडे, प्रतिभा कुलकर्णी, संगीता साळवे, तुळशीराम कातोरे, भरती गायकवाड, सविता काळे, राजाराम गंभीरे, प्रकाश साबळे, अविनाश धुमाळ, संदीप शिंदे, खंडू वाकचौरे, मथुराबाई बर्डे, नंदू गवांदे, साहेबराव घोडे, भाऊसाहेब मेंगाळ आदी आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत.


Tags: CPM aggressivetribes issuesआदिवासी दिनमाकपमार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष
Previous Post

मुंबईत नकलीनंतर आता यूपीत कोरोना लस म्हणून गॅसचं इंजेक्शन!

Next Post

सावधान! सिम कार्ड अपडेट करायचंय? पुणेरी भामट्याचे प्रताप वाचा…

Next Post
sim card

सावधान! सिम कार्ड अपडेट करायचंय? पुणेरी भामट्याचे प्रताप वाचा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!