मुक्तपीठ टीम
Covishield आणि Covaxin या दोन कोरोना प्रतिबंधक लसींबद्दल शंकांचे निरसन करणारे सर्वेक्षण नुकतेच झाले आहे. त्यातून या लसींचे कोणतेही गंभीर साइड इफेक्ट नसल्याचं उघड झाले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडे सध्या तरी लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे. मात्र, लसीच्या दुष्परिणामांबाबत लोकांच्या मनात अनेक शंका आहेत. त्या सर्वेक्षणामुळे दूर होतील.
कोविशील्डचे दोन्ही डोस घेणाऱ्यांपैकी ७५ टक्के आणि कोवॅक्सिनचा दोन्ही डोस घेणाऱ्यांपैकी ७८ टक्के लोकांनी एकतर अत्यंत सौम्य लक्षणे अनुभवली आहेत. परंतू कोणतेही दुष्परिणाम झाले नसल्याचे दिसून आले आहे.
सर्वेक्षणात कोण सहभागी?
- देशभरातील ३८१ जिल्ह्यांतील ४० हजार लोकांनी आपला अभिप्राय दिला आहे.
- ६२ टक्के पुरुष आणि ३८ टक्के महिलांनी सर्वेक्षणात भाग घेतला.
पहिल्या डोसनंतरचे अनुभव
- कोविशील्डचा पहिला डोस घेणाऱ्यांपैकी ३० टक्के, तर कोवॅक्सिनचा पहिला डोस घेणाऱ्या ३६ टक्के लोकांना ताप किंवा इतर कोणतीही लक्षणे आहेत.
- त्यांच्यापैकी कोणीही गंभीर समस्येची तक्रार केली नाही.
दुसऱ्या डोसनंतर काय जाणवले?
- कोविशील्डचा दुसरा डोस घेणाऱ्यांपैकी ७५ टक्के आणि कोवॅक्सिनचा दुसरा डोस घेणाऱ्यांपैकी ७८ टक्के लोकांनी अत्यंत सौम्य लक्षणे अनुभवली आहेत.
- परंतू कोणतेही गंभीर दुष्परिणाम झाले नसल्याचे दिसून आले आहे. कोविशील्ड घेणाऱ्यांपैकी चार टक्के आणि कोवॅक्सिन घेणाऱ्यांपैकी दोन टक्के लोकांनी कोरोना असल्याची तक्रार केली.
पाहा व्हिडीओ: