मुक्तपीठ टीम
कोविशिल्ड कोरोना लसीच्या पहिल्या आणि दुसर्या डोसमधील अंतर आता ६ ते ८ आठवड्यांवरून १२- १६ आठवड्यांपर्यंत वाढवण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय अभ्यासावर आधारीत निष्कर्षांच्या आधारे देशातील तज्ज्ञांच्या समितीने अंतर वाढवण्याची शिफारस केली होती. त्या शिफारशीला केंद्र सरकारने गुरुवारी स्वीकारले. कोवॅक्सिन डोसच्या अंतरामध्ये मात्र कोणतेही बदल जाहीर केले गेलेले नाहीत. सध्याप्रमाणेच चार ते सहा आठवड्यांपर्यंत राहील.
ब्रिटनमधील कोरोना कार्यकारी गटाने वास्तविक पुराव्यांचा अभ्यास करुन कोविशिल्ड .लसीच्या दोन डोस दरम्यानचे अंतर १२-१६ आठवड्यापर्यंत राखणे अधिक प्रभावशाली ठरत असल्याचे निष्कर्ष काढले आहेत. नॅशनल एक्सपर्ट ग्रुप व्हॅक्सीन अॅडमिनिस्ट्रेशने बुधवारी हे बदल मान्य केले.
#NewsFlash: Gap between 2 doses of #Covishield extended to 12-16 weeks! #IndiaFightsCorona pic.twitter.com/DqmA51svxx
— MyGovIndia (@mygovindia) May 13, 2021
कोविशिल्डच्या डोसमधील अंतर वाढवण्याची ही तीन महिन्यांतून दुसरी वेळ आहे. मार्चमध्ये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितले गेले होते की “चांगल्या परिणामांसाठी” अंतर सहा ते आठ आठवड्यांपर्यंत वाढवले जावे.
हे ही वाचा: कोविशिल्ड दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय कसा झाला?