मुक्तपीठ टीम
कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर काही नागरिकांसाठी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी ते केंद्रीय यंत्रणेने १२ ते १६ आठवड्यांवर नेले आहे. परंतु सध्या आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी लसीकरण पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. त्यामुळे काहींसाठी कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर २८ दिवसांवर आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी काही निकष ठरवण्यात आले आहेत.
कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी कोणासाठी?
• आवश्यक कामांसाठी परदेशी प्रवास करणाऱ्यांना कोविडशील्ड लसीचा दुसरा डोस लवकर मिळण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिली आहे.
• अशा लोकांना आता कोविशिल्डचा दुसरा डोस २८ दिवसांनंतर घेता येईल.
• बाकीच्यांसाठी १२ ते १६ आठवड्यांची मुदत असेल.
• ज्यांना नोकरी, शिक्षण, टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यांसाठी तात्काळ परदेशी जायचे आहे, परंतु त्यांनी कोविशिल्डचा पहिला डोस घेतला आहे आणि अजून दुसरा डोस घेण्यास वेळ आहे. त्यांना ही सूट दिली जात आहे.
• पहिल्या डोसनंतर २८ दिवसांनंतर ते लसीचा दुसरा डोस घेऊ शकतात.
अशा लोकांसाठी ३१ ऑगस्ट २१ पर्यंत ही सुविधा उपलब्ध असेल असे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यांच्या लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरही पासपोर्ट क्रमांक नोंदविला जाईल. यासह, त्यांना लसीकरणाच्या वेळी पासपोर्टही दाखवावा लागेल.
राज्यांना सूचना
• केंद्राने दोन डोसमधील कालावधी कमी केलेल्या अशा लोकांना ही सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्राने राज्यांना जिल्हास्तरावर नोडल अधिकारी घोषित करण्यास सांगितले आहे.
• जे कागदपत्रांच्या छाननीनंतर अशा प्रकरणांमध्ये लवकर लसीकरण करण्यास परवानगी देईल.
• मंत्रालयाने असे म्हटले आहे की अशा लोकांनी आपल्या माहिती तपशिलात टाइप ऑफ वॅक्सिनच्या कोविडशील्ड लिहावे लागेल.
• इतर कोणतेही तपशिल भरण्याची आवश्यकता नाही.
• कोविशिल्डचा जागतिक आरोग्य संघटनेच्या मंजूर लसींच्या यादीमध्ये समावेश आहे.