Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘या’ कारणामुळे थांबले मुंबईतील लसीकरण!

January 17, 2021
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
vaccination

मुक्तपीठ टीम

कोरोना प्रतिबंधक लसीच्या लसीकरणास शनिवार, १६ जानेवारीला सुरूवात झाली. मात्र, रविवार आणि सोमवारी लसीकरण होणार नसल्याचे आरोग्य विभाग आणि मुंबई पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोना लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी करणे गरजे आहे. ऑफलाइन नोंदणी करू नये. कोविन अॅप मार्फतच नोंदणी करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. पण अॅपमध्ये तांत्रिक अडथळे निर्माण झाल्याने कोरोना लसीकरण रद्द करण्यात आले आहे. तसेच कोविन अॅपबाबत तांत्रिक अडथळे दूर झाल्यानंतरच लसीकरणास सुरूवात होणार असल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास आणि मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

मुंबईत शनिवारी झालेल्या लसीकरणादरम्यान काही जणांची कोविन अॅपवरून नोंदणी झाली नाही. त्यामुळे त्यांना दूरध्वनी करून लस घेण्यासाठी बोलावण्यात आले होते. शनिवारी ऑफलाइन नोंदणी केंद्राच्या निर्देशानुसार करण्यात आली होती, असे काकाणी यांनी स्पष्ट केले आहे. अॅपमधील अडचणी असल्याने आणि पुढे जाऊन नवीन लसी येतील तेव्हा नोंदणीत अडचणी येण्याची शक्यता असल्याने लसीकरण दोन दिवस होणार नाही, असे डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

‘कोरोना लसीकरण मोहिमेची काल अंमलबजावणी करत असताना, या मोहिमेसाठी कार्यरत असलेल्या कोविन ॲप मध्ये तांत्रिक समस्या उद्भवत असल्याचे निदर्शनास आले. ही समस्या दूर करण्याचे प्रयत्न केंद्र शासनाकडून सुरू आहेत. कोरोना लसीकरण करत असताना संपूर्णपणे डिजिटल नोंदणी करणे सक्तीचे आहे. तांत्रिक अडचण आली असता ऑफलाइन नोंदी करण्यास शासनाने परवानगी दिली होती. तथापि, यापुढील सर्व नोंदी ॲप द्वारेच करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. ही बाब लक्षात घेता, मुंबईत रविवार दिनांक १७ जानेवारी २०२१ आणि सोमवार दिनांक १८ जानेवारी २०२१ असे दोन दिवस कोरोना लसीकरण स्थगित ठेवण्यात आल्याचे मुंबई पालिकेच्या वतीने जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात आरोग्य विभागातर्फे नियोजित असलेले कुठलेही कोरोना लसीकरण सत्र रद्द करण्यात आलेले नाही. तर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील आठवड्यामध्ये चार दिवस लसीकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहे, असे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


Tags: coronacorona virus prevention vaccinationcovid19Maharashtravaccinationvaccination temporarily suspendedआरोग्य विभागको-विन अॅपकोरोनाकोरोना प्रतिबंधक लसकोव्हिड-१९
Previous Post

शरीर तंदुरुस्त राखायचं आहे?…मग ‘WHO’ चे ऐका!

Next Post

बिल गेट्स बनले अमेरिकेतील सर्वात मोठे शेतकरी

Next Post
Bill Gates

बिल गेट्स बनले अमेरिकेतील सर्वात मोठे शेतकरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!