मुक्तपीठ टीम
कोरोना महासाथीच्या काळात आपले कर्तव्य उत्कृष्टपणे बजावल्याबद्दल महाराष्ट्रातील चार महिला पोलीस अधिकाऱ्यांना दिल्लीत सन्मानित करण्यात आले. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते त्यांचा ‘कोविड वूमन वॉरियर’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या २९ व्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी येथील विज्ञान भवनात हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा तसेच आयोगाचे सदस्य उपस्थित होते.
Recognition of work done by Maharashtra police during COVID-19 tough times @NCW pic.twitter.com/PUV7UpIG1z
— Tejaswi Satpute (@TejaswiSatpute) February 1, 2021
कोरोना महासाथीच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता ज्या-ज्या महिलांनी विविध क्षेत्रात कर्तव्यपालन केले त्यांना याप्रसंगी सन्मानित करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील चार महिला पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सोलापूर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपूते, औरंगाबाद पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंह, मुंबई पोलीस उपायुक्त नियती ठाकर-दवे यांना यावेळी गौरविण्यात आले.
पाहा व्हिडीओ