मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना वाढताना दिसत आहे. पुणे शहरात कोरोनाचे वाढते प्रकरण पाहाता रात्री अकरानंतर बिनकामाचे फिरणाऱ्यांवर प्रतिबंध लावण्यात आले आहेत. याकाळात केवळ आवश्यक सेवांसाठी संचार करण्यास अनुमती देण्यात आली आहे. तसेच काही दिवसांपासून सुरू झालेले पुण्यातील शाळा-महाविद्यालये पुन्हा एकदा २८ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
“कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता पुण्यात रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत काही काम नसल्यास बाहेर पडण्याची परवानगी दिली जाणार नाही. केवळ आवश्यक सेवांसाठी परवानगी दिली जाईल. जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालये २८ फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील”, असे आदेश पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.
पुण्यात पुन्हा वाढतोय कोरोना
पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, “कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहेत. गेल्या १५ दिवसात कोरोना रुग्ण वाढीचा दर फक्त ४.५ ते ५ टक्के होता. तो आता १० टक्क्यांवर गेला आहे.”
विसरु नका कोरोना सूचना…
- लॉकडाउननंतर सुरु झालेल्या शाळा-महाविद्याले २८ फेब्रुवारीपर्यंत राहतील. या निर्णयावर पुढील विचार शुक्रवारी होईल.
- हाटेल, रेस्टॉरंट्स, बार अकारानंतर बंद राहतील.
- रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत मर्यादित संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
- लोकांना फक्त आवश्यक कामांसाठी घराबाहेर जाऊ दिले जाईल.
- मात्र भाजी विक्रेते, वृत्तपत्र विक्रेते आणि इतरांना या बंदीमधून वगळण्यात आले आहेत.
- खाजगी कोचिंगचे क्लासेस बंद राहतील. तसेच काही कोचिंगना फक्त ५०% क्षमतेसह उघडता येईल.
- राज्यांतर्गत वाहतुकीवर कोणतीही बंधनं लावण्यात आलेली नाहीत. परंतु प्रवासी आणि वाहतूक संस्थांना कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागेल.
- लग्न समारंभांसाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल.