मुक्तपीठ टीम
हैदराबादच्या भारत बायोटेक कंपनीला कोवॅक्सिनची २ ते १८ वर्षांच्या मुलांवर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याची चाचणी करण्यासाठी ‘ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ने परवानगी दिली आहे. या चाचण्या यशस्वी झाल्यास लवकरच १८ वर्षाखालील वयोगटात असलेल्यांचेही कोरोनापासून संरक्षणासाठी लसीकरण केले जाईल. एनआयटीआय आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल यांनी सांगितले की १० ते १२ दिवसांच्या आत देशात २ ते १८ वर्षांच्या मुलांसाठी कोवॅक्सिनची चाचणी सुरू होईल.
मुलांवरील पुढील टप्प्यातील चाचण्यांचा मार्ग मोकळा
• ११ मे रोजी डीजीसीआयने मुलांवर कोवाक्सिनच्या क्लिनिकल चाचणीसाठी परवानगी दिली आहे.
• सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने याची शिफारस केली होती, त्यानंतर क्लिनिकल चाचण्यांना परवानगी देण्यात आली.
• आता दुसर्या व तिसर्या टप्प्यातील चाचण्या सुरू होणार आहेत.
• गेल्या वर्षी भारत बायोटेकने ५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांना लसींच्या क्लिनिकल चाचण्यांसाठी परवानगी मागितली होती.
• परंतु त्यावेळी सेंट्रल ड्रग रेग्युलेटरने त्यांचा अर्ज फेटाळून लावत असे म्हटले की, त्यांनी प्रथम प्रौढांवरील लसीच्या परिणामासंबंधित सांख्यिकी सादर करावी.
यावेळी डॉ. व्ही.के. पॉल यांनी अशी माहिती दिली की, कोरोना उपचारात कोरोनावरील डीआरडीओच्या औषध २ डीजीच्या समावेशाचा विचारही केला जात आहे. सध्या, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) केवळ आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे.