Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोवॅक्सिन लसीचं उत्पादन वाढणार, भारत बायोटेक, हाफकिनसह तीन संस्थांना केंद्राचं सहाय्य

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
covaxin

मुक्तपीठ टीम

कोरोनाविरोधी लसींच्या उपलब्धतेसाठी केंद्र सरकारने योग्य नियोजन केले आहे. लसींपासून कुणीही वंचित राहू नये याची काळजी घेतली जाणार आहे. तसेच कोवॅक्सिनचे उत्पादन वाढवण्यासाठी भारत बायोटेक, हाफकिन इंस्टिट्यूट यांच्याप्रमाणेच देशातील आणखीही काही संस्थांना केंद्र सरकार सहाय्य करीत आहे. त्यामुळे लवकरच या संपूर्णत: स्वदेशी लसीचे उत्पादन आणि पुरवठा वाढण्याची शक्यता आहे.

कोवॅक्सिन वाढीसाठी सरकारी प्रयत्न

  • कोवॅक्सिन उत्पादनात वृद्धीसाठी भारत बायोटेक आणि मुंबईतील हाफकीन बायोफार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेड, हैदराबाद येथील इंडियन इम्युनोलॉजिकल लिमिटेड, बुलंदशहरमधील भारत इम्युनोलॉजिकल बायोलॉजिकल कॉर्पोरेशन लिमिटेड या ३ सार्वजनिक क्षेत्र उपक्रमांच्या सुविधांमध्ये भर घालण्यासाठी सहाय्य करण्यात येत आहे.
  • याशिवाय गुजरात कोविड वॅक्सीन कन्सोर्टियमकडे कोवॅक्सिन उत्पादन तंत्रज्ञान हस्तांतरण सुलभ करण्यात येत आहे.
  • गुजरात कोरोना वॅक्सिन कन्सोर्टियममध्ये हेस्टर बायोसायन्सेस, ओम्नी बीआरएक्स बायोटेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड आणि गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर,विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, गुजरात सरकार यांचा समावेश आहे.

 

लस उत्पादकांना आगाऊ रक्कम

  • आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने देशातल्या लस उत्पादकांना, त्यांच्याकडे नोंदवण्यात आलेल्या खरेदी ऑर्डरसंदर्भात १०० टक्के आगाऊ रक्कम पुरवली आहे.
  • याशिवाय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत केंद्रीय औषध मानक आणि नियंत्रण संस्थेने (सीडीएससीओ), कोरोना लसींच्या वैद्यकीय चाचणी आणि मंजुरीसाठीच्या अर्जांसंदर्भातली प्रक्रिया वेगाने करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित केली आहे.
  • कोणत्याही सामाजिक-आर्थिक स्तरातल्या पात्र लाभार्थींना सुरक्षित कोरोना लस मिळणे शक्य होण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने योग्य नियोजन केले आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाना लस उपलब्धतेबाबत १५ दिवस आधीच माहिती केंद्र सरकार देत आहे.

 

लस घेण्याबत टाळाटाळ होऊ नये आणि लसीबाबत जनतेच्या मनातला विश्वास कायम राखण्यासाठी संवाद रणनीतीचा अवलंब करण्यात येत आहे. उत्पादन आणि कोरोना लस उपलब्धतेनुसार, पात्र लाभार्थींना, लस मिळावी यासाठी केंद्र सरकारने सर्व व्यवस्था केली आहे. १८ वर्षे आणि त्यावरील पात्र लाभार्थींच्या लसीकरणासाठी जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२१ दरम्यान पुरेश्या प्रमाणात कोरोना प्रतिबंधक लसी उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे.

 

लस आणि औषधांचे किंमत गणित

  • कोणतीही औषधे, लसी यांचा उत्पादन खर्च हा विकास खर्च, बौद्धिक संपदा हक्क खर्च, तंत्रज्ञान, लस प्लाटफॉर्म आणि विविध कंपन्यामध्ये उत्पादनांचे प्रमाण यावर अवलंबून असतो.
  • ‘मिशन कोरोना सुरक्षा –कोरोना प्रतिबंधक भारतीय लस विकास अभियान’हे जैव तंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्य परिषदे मार्फत राबवण्यात येते अशी माहिती जैव तंत्रज्ञान विभागाने दिली आहे.
  • केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि खते आणि रसायन मंत्री मनसुख मांडवीय यांनी शुक्रवारी राज्य सभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

Tags: bharat biotechcovaxinHalfkin Biopharma Corporationvaccineकेंद्र सरकारकोवॅक्सिनगुजरातभारत बायोटेकमनसुख मांडवीयाहाफकिन इंस्टिट्यूट
Previous Post

राज्यात ५ हजार ५३९ नवीन रुग्णांचे निदान, ५ हजार ८५९ रुग्ण बरे होऊन घरी!

Next Post

पूरग्रस्तांच्या मदतीसोबतच राष्ट्र सेवा दलानं दाखवलं महामार्ग स्वच्छतेचं भान!

Next Post
RSD

पूरग्रस्तांच्या मदतीसोबतच राष्ट्र सेवा दलानं दाखवलं महामार्ग स्वच्छतेचं भान!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!