Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

संजय राऊतांच्या ईडी कोठडीत वाढ, पत्नीलाही ईडीचं समन्स!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Court extends Sanjay Raut's ED custody till 8 Aug,

मुक्तपीठ टीम

गोरेगाव पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांचा कोठडीतील मुक्काम आणखी चार दिवसांनी वाढला आहे. संजय राऊत यांना ८ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली. संजय राऊत चौकशीत सहकार्य करत नाहीत, असा आरोप ईडीने कोर्टात केला. दरम्यान पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावलं आहे.

संजय राऊत यांना ४ दिवसांची ईडी कोठडी!!

  • पत्राचाळीतील घोटाळ्याच्या आरोपाप्रकरणी त्यांना ३१ जुलै रोजी ईडीने ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याच दिवशी त्यांना अटक करण्यात आली होती.
  • त्यानंतर दुसऱ्या दिवशी कोर्टाने त्यांनी तीन दिवसांची ईडी कोठडी सुनावली होती.
  • त्यानंतर आता त्यांना पुन्हा चार दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.
  • सुनावणी दरम्यान संजय राऊतांनी ईडी कोठडीच्या व्यवस्थेबाबत कोर्टाकडे तक्रार केली होती.
  • त्याचबरोबर स्वप्ना पाटकर यांच्या वकिलांनीही धमक्या दिल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता.
  • पण ते कोठडीत असताना ते धमक्या कसे देऊ शकतात असा प्रतिप्रश्न कोर्टाने त्यांना केला होता.
  • त्यानंतर अलिबाग येथील जमीन खरेदीवेळी राऊतांच्या पत्नीच्या अकाऊंटवर आलेल्या पैशांच्या संबंधात चौकशी करण्याची मागणी ईडीच्या वकिलांनी केली होती.
  • यावेळी राऊतांच्या वकिलांनी युक्तिवाद करताना अकाऊंटवर आलेले पैसे हे अनोळखी व्यक्तीने पाठवले असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
  • तर हे पैसे कुणी आणि का पाठवले याची चौकशी करायची असल्याचं सांगत ईडीच्या वकिलांनी कोठडीची मागणी केली होती.
  • दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत ईडीने संजय राऊतांना ४ दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊतांना ईडीचं समन्स!!

  • प्रकरणामध्ये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सुद्धा ईडीने समन्स पाठवले आहे.
  • पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी जे काही व्यवहार झाले त्यात प्रामुख्याने अलीबाग येथील जमीनीसह अनेक व्यवहार हे वर्षा राऊत यांच्या नावावर झाले आहेत.
  • वर्षा राऊत यांच्या बँक खात्यात करोडो रुपयांचे व्यवहार झाले आहेत.
  • खात्यात हे पैसे कुणी ट्रान्सफर केले.
  • या कथीत घोटाळ्यात वर्षा राऊत यांचा नेमका संबंध काय या सगळ्याचीच ईडी चौकशी करणार आहे.
  • वर्षा राऊत यांना चौकशीसाठी उद्या सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
  • याआधी जानेवारी महिन्यात वर्षा राऊत चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या.
  • यावेळी ईडी अधिकाऱ्यांनी त्यांची जवळपास साडेतीन ते चार तास चौकशी करण्यात आली होती.

Tags: EDPatra Chawl Scamsanjay rautVarsha Rautईडीपत्राचाळ घोटाळावर्षा राऊतसंजय राऊत
Previous Post

मंकीपॉक्सचा धोका ओळखा! मास्क वापरा, अंतर ठेवा, कोरोनासारखीच काळजी घ्या!!

Next Post

महागाई, जीएसटी, बेरोजगारी व ‘अग्निपथ’विरोधात उद्या शुक्रवारी राजभवनला घेराव घालणार! : नाना पटोले

Next Post
rahul gandhi Nana patole Sonia Gandhi

महागाई, जीएसटी, बेरोजगारी व ‘अग्निपथ’विरोधात उद्या शुक्रवारी राजभवनला घेराव घालणार! : नाना पटोले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!