Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

खासदार नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र न्यायालयाकडून रद्द, खासदारकी धोक्यात

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
navneet rana

मुक्तपीठ टीम

अमरावती लोकसभा मतदारसंघातील खासदार नवनीत राणा यांना मोठा धक्का बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचे जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र हे रद्द केले आहे, शिवाय त्यांना २ लाख रुपायांचा दंड ठोठावला आहे. २०१९ मध्ये राणा यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती, मात्र त्यांच्या प्रमाणपत्रांविरोधात शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली होती. याच पार्श्वभूमीवर आज प्रमाणपत्राच्या आणि जात पडताळणी प्रमाणपत्राला न्यायालयाने अवैध ठरवले आहे.त्यामुळे आता राणांना खासदारकी सोडावी लागणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. त्याचवेळी या मुद्द्यावर नवनीत राणांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसुळ यांनी प्रयत्न सुरु केले आहेत.

संपूर्ण प्रकरण नेमंक काय?

• २०१३ मध्ये नवनीत कौर यांनी रवी राणा यांच्याशी लग्न केले.
• त्यानंतर त्यांनी अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र मिळवलं.
• त्याची पडताळणी करण्यात आली होती.
• या प्रमाणपत्राविरोधात २०१७ मध्ये शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी याचिका दाखल केली.
• त्यानंतर न्यायालयानं जात प्रमाणपत्र पुन्हा पडताळणीसाठी पाठवलं.
• याच प्रमाणपत्राच्या आधारे नवनीत राणांनी २०१९ लोकसभेची निवडणूक लढवली आणि जिंकली.

 

नवनीत राणा…फिल्मी डायलॉग ते राजकीय भाषण!

• नवनीत राणा यांचा जन्म ३ जानेवारी १९८६ रोजी मुंबईत झाला.
• त्यांनी तेलुगू, पंजाबी, हिंदी आणि मल्याळम चित्रपटसृष्टीत काम केले आहे.
• चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी नवनीत राणा या मॉडेलिंग करायच्या.
• मात्र, २०११ साली रवी राणा यांच्याशी लग्न झाल्यानंतर नवनीत राणा यांनी चित्रपटसृष्टीपासून दूर झाल्या.
• ३१०० जोडप्यांसह त्यांनी सामूहिक विवाहसोहळ्यात नवनीत राणा यांच्याशी लग्नगाठ बांधली होती.
• या विवाहसोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्ती उपस्थित होत्या.

राणांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची अडसूळांची तयारी

• मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती धनुका आणि न्यायमूर्ती बिश्त यांच्या खंडपीठानं हा निकाल दिला आहे.
• नवनीत राणा यांच्या विरोधात शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी दोन याचिका दाखल केल्या होत्या.
• त्यामध्ये पहिली याचिका ही जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्राबाबतची होती.
• दुसरी याचिका ही लोकसभा निवडणूकीदरम्यान दाखल केलेल्या जात प्रमाणपत्राबाबतची होती.
• यामधील २०१७ च्या याचिकेवर निकाल देताना खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्र कोर्टाने अवैध ठरवले आहे.
• नवनीत राणा यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचीही तयारी आनंदराव अडसूळ करीत आहेत.

 

खासदारकी धोक्यात आल्याची चर्चा

• यालयाच्या जात प्रमाणपत्राच्या निकालामुळे याठिकाणी नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात असल्याची चर्चा रंगली आहे.
• निवडणूक आयोगाला सादर केलेले प्रमाणपत्र किंवा प्रतिज्ञापत्र खोटं ठरलं तर संबंधित सदस्याच पद रद्द होऊ शकतं.


Tags: caste certificateNavneet ranaShivsenaआनंदराव अडसूळनवनीत राणामुंबई उच्च न्यायालयरवी राणा
Previous Post

मोदी – ठाकरे भेट का महत्वाची? मराठाच नाही ओबीसी राजकीय, पदोन्नती आरक्षणासाठीही केंद्राची साथ आवश्यक!

Next Post

पंतप्रधानांना मुख्यमंत्र्यांसह राज्याचे मंत्री भेटले, तेव्हा कोणते मुद्दे मांडले?

Next Post
cm & pm

पंतप्रधानांना मुख्यमंत्र्यांसह राज्याचे मंत्री भेटले, तेव्हा कोणते मुद्दे मांडले?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!