मुक्तपीठ टीम
पंतप्रधान किसान सन्मान निधीचा ९ वा पुढचा हप्ता ऑगस्टमध्ये कधीही येऊ शकतो. तर मागील हप्ता ३१ जुलैपर्यंत येणं सुरू राहील. पीएम किसान पोर्टलवर २० जुलै २०२१ पर्यंत दिलेल्या आकडेवारीनुसार, २७ लाखाहून अधिक शेतकर्यांचे व्यवहार अयशस्वी झालेत. याचाच अर्थ सरकारने त्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवले पण काही कारणास्तव ते पोहोचू शकले नाहीत. .
त्याचबरोबर राज्य सरकारकडून १ कोटी ९५ लाख देयकं थांबवण्यात आली आहेत. तर पीएफएमएस मधील ३१ लाखाहून अधिक शेतकऱ्यांचा डेटा प्राथमिक स्तरावरच नाकारला गेला आहे. १२ कोटी ३६ लाखांहून अधिक डेटापैकी केवळ २ कोटी ८१ लाखांची दुरुस्ती झाली आहे.
काय आहे प्रक्रिया?
- शेतकऱ्याचे नाव “इंग्रजी” मध्ये असणे आवश्यक आहे
- अर्जामध्ये ज्या शेतकऱ्याचे नाव “हिंदी” मध्ये असेल, त्यांनी कृपया नाव बदलून घ्या.
- अर्जामधील अर्जदाराचे नाव आणि बँक खात्यात अर्जदाराचे नाव यात फरक आहे.
- शेतकऱ्याला त्याच्या बँक शाखेत जाऊन आधार आणि अर्जात दिलेल्या नावानुसार बँकेत नाव नोंदवावे लागेल.
नेमकी चूक काय होते?
- आयएफएससी कोड लिहिताना चूक.
- बँक खाते क्रमांक लिहिण्यात चूक.
- गावाचं नाव लिहिताना चूक.
कशी कराल दुरुस्ती?
- वरील सर्व प्रकारच्या त्रुटी सुधारण्यासाठी आधार पडताळणी आवश्यक आहे.
- आधार पडताळणीसाठी, शेतकऱ्यांनी जवळच्या सीएससी / वसुधा केंद्र / सहज केंद्राशी संपर्क साधावा.
कशी कराल नोंदणी?
- सर्वप्रथम आपल्याला पंतप्रधान किसान वेबसाइट pmkisan.gov.in वर जावे लागेल.
- याठिकाणी शीर्षस्थानी एक लिंक फॉर्मर्स कोपरा दिसेल
- आपण या लिंकवर क्लिक केल्यास, आधार एडिटची एक लिंक दिसेल, तिथे आपल्याला क्लिक करावे लागेल.
- यानंतर, आपल्यासमोर जे पेज उघडले जाईल त्यावर आपण आपला आधार नंबर दुरुस्त करू शकता.
- जर खाते क्रमांक चुकीचा असेल तर तुमचं कृषी विभाग कार्यालय किंवा लेखापालशी संपर्क साधावा.