Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईतील एथिकल हॅकरने लसीकरण साइट हॅक केल्याचा आरोप

September 6, 2026
in कायदा-पोलीस
0
icmr (2)

मुक्तपीठ टीम

मुंबईतील एका एथिकल हॅकरने लसीसाठी ऑनलाईन स्लॉट बुक करणारी साइट हॅक केली असल्याची तक्रार मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये करण्यात आली आहे. गेले काही दिवस महाराष्ट्रासह देशभरात लस टंचाई जाणवत असतानाच लसीकरणाचे स्लॉट नोंदणी सुरु होताच झटकन ऑनलाइन भरले जात असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. हे नेमकं कसं घडतं, यावर चर्चा सुरु असतानाच आता हॅकिंगचा आरोप पुढे आला आहे.

मुंबईतील या हॅकरला

साइट उघडण्यापूर्वीच रिकाम्या स्लॉटची माहिती मिळते. टेलीग्राम आणि व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे ही माहिती मिळते. हा दावा सायबर कायदा तज्ज्ञ आयुष तिवारी यांनी केल्याची बातमी आहे. या हॅकरबद्दल संपूर्ण माहिती संबंधित यंत्रणेला दिल्याचाही दावा करण्यात आला आहे.

कोविन ट्रॅकर ग्रुपशी संबंधित हे आठ तरुण आहेत. तरुणांनी सांगितले की या गटातील सामान्य लोकांच्याआधी त्यांना कळतं की,लस कधी येणार आहे आणि किती स्लॉट रिक्त आहेत. आयुष यांनी माहिती गोळा केली असता, तसे करणारा हॅकर हा मुंबईचा असल्याचे समजले. त्याने देशातील विविध शहरात ग्रुप तयार केले आहेत.

लसीकरण स्लॉटवर ऑनलाइन डल्ला कसा मारतात?

  • हॅकरने कोविन पोर्टल वेब एपीआयचा वापर करून लिंक केले.
  • यामुळे त्याला आधीच माहिती मिळते आणि तो स्लॉट बुक करतो.
  • विशेष म्हणजे मध्यप्रदेशच्या इंदूरमधील लसीकरण अधिकारी डॉ. प्रवीण जाडिया यांनी शनिवारी डीआयजी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे साइट हॅक झाल्याची तक्रार दिली होती.
  • आता सायबर कायदा तज्ज्ञांनी उघडपणे नावांनिशी तक्रार केल्याने लसीकरण सायबर स्लॉट चोरी नेमकी कशी होते ते उघड झाले आहे.
  • महाराष्ट्रातही ग्रामीण भागातील लसींवर बाहेरच्या शहरांमधील शहरी नागरिक डल्ला मारत असल्याच्या तक्रारी झाल्या आहेत.
  • महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी तर गुजरातसीमेवरील जिल्ह्यांमध्ये बाहेरील राज्यांमधून लोक येऊन लस घेत असल्याचा आरोपही केला होता.
  • या प्रकरणी मुक्तपीठनं रायगड जिल्ह्यातील डॉक्टरांच्या तक्रारीनंतर बातमीही दिली होती.

Tags: Co-win Appcoronaethical hackervaccination siteकोविन पोर्टललसीकरण साइटहॅक
Previous Post

कोरोनावरील प्लाझ्मा थेरपी उपचार कोरोना प्रोटोकॉलमधून का हद्दपार? समजून घ्या कारणं…

Next Post

मराठा आरक्षण : समजून घ्या मराठा समाजाचं वास्तव!

Next Post
maratha-reservation

मराठा आरक्षण : समजून घ्या मराठा समाजाचं वास्तव!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!