Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मीठाच्या पाण्याने कोरोना चाचणी, फक्त तीन तासात रिपोर्ट!

June 1, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
CSIR

मुक्तपीठ टीम

कोरोना महामारीचा जगभर उद्रेक झाल्यापासूनच भारतात चाचण्या करण्याची क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. चाचणीच्या पायाभूत क्षमता आणि चाचणी क्षमता वाढवण्यासाठी विविध स्तरांवरुन हे प्रयत्न सुरु आहेत. नागपूरची राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था म्हणजेच नीरीने वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद CSIRच्या मार्गदर्शनाखाली एक मोठी कामगिरी बजावली आहे. या चाचण्यांच्या संशोधन प्रवासात निरीने आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. या संस्थेने कोरोनाच्या नमुना चाचणीसाठी ‘मिठाच्या पाण्याच्या गुळण्यातून होणारी आरटी-पीसीआर पद्धत’ शोधून काढली आहे.

अनेक लाभ असलेली पद्धत : सुलभ, जलद, सहज, किफायतशीर

• गुळण्या करण्याच्या पद्धतीचे अनेक लाभ आहेत, सगळे लाभ या एका छोट्या उपकरणातून मिळतात.
• हे उपकरण अत्यंत सुलभ, जलद, किफायतशीर, रुग्ण-स्नेही आणि आरामदायक आहे.
• या उपकरणामुळे जलद निकाल मिळतात आणि ग्रामीण आणि आदिवासी भागांसाठी हे अत्यंत उपयुक्त आहे कारण, या चाचणीसाठी किमान पायाभूत सुविधांची गरज असते.

 

नेमके कशी करणात मिठ गुळणी चाचणी?

• नीरीच्या पर्यावरणीय विषाणू संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ कृष्णा खैरनार यांनी चाचणीची पद्धत सांगितली.
• “स्वॅब गोळा करण्याच्या पद्धतीला वेळ लागतो.
• त्यापेक्षाही अधिक महत्वाचे म्हणजे, हे शरीरात आत साधन घालून, स्वॅब काढण्याचे तंत्रज्ञान असल्याने, रुग्णांसाठी ते जरा त्रासदायक असते.
• त्याशिवाय, काही दुर्गम, ग्रामीण भागातून, गोळा केलेले नमुने संकलन केंद्रांत आणण्यासाठी वेळ जातो.
• दुसरीकडे मिठाच्या पाण्याने गुळण्या करण्याची आरटी-पीसीआर पद्धत ही जलद, आरामदायक आणि रुग्ण-स्नेही पद्धत आहे.
• त्याचे नमुने लगेच संकलित केले जातात आणि निष्कर्ष तीन तासांत मिळू शकतात.”
• ही पद्धत, आतमध्ये काही उपकरण घालून स्वॅब नमुने घेण्याची पद्धत नाही. ती अत्यंत सुलभ पद्धत आहे,
• जी वापरून, रुग्ण स्वतःच आपले नमुने गोळा करू शकतो, अशी माहिती खैरनार यांनी पुढे दिली.
• “नाकातून आणि तोंडातून स्वॅब संकलित करण्यासाठी तंत्रज्ञान तज्ञांची गरज असते; शिवाय, ही पद्धत अत्यंत वेळखाऊ देखील आहे.

रुग्ण स्वतःही नमुने गोळा करु शकतात

• मिठाच्या पाण्यातून गुळण्या करण्यासाठी केवळ खारे पाणी असलेली नलिका वापरली जाते.
• गुळण्या केल्यावर रुग्णाने ते पाणी त्या नलिकेत जमा करायचे असते.
• हा नमुना मग प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला जातो.
• तिथे सामान्य तापमानात, नीरीने तयार केलेल्या एका विशिष्ट द्रावणात ते मिसळून ठेवले जाते.
• त्यानंतर जेव्हा हे द्रावण गरम केले जाते, त्यावेळी, आरएनए टेम्प्लेट तयार होते.
• या आरएनएमधून पुढे आरटी-पीसीआर म्हणजेच, रिव्हर्स ट्रान्सक्रीप्शन पॉलिमरेस चेन रिएक्शन (RT-PCR) प्रक्रिया केली जाते.
• नमुना संकलनाच्या आणि प्रक्रियेच्या या विशिष्ट पद्धतीमुळे आरएनए वेगळे काढण्याच्या महागड्या प्रक्रियासाठी लागणाऱ्या खर्चाची बचत होते.

 

नागपूरच्या @CSIR_NEERI विकसित केले मीठाच्या पाण्याने गुळण्यांच्या माध्यमातून #COVID19 #RTPCR चाचणी करणारे अभिनव रुग्णस्नेही उपकरण

उपकरणाच्या वापरासंदर्भात नीरीच्या पर्यावरणीय विषाणू संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ कृष्णा खैरनार यांचा व्हिडीओ👇

📙https://t.co/k7XTfnLjWL pic.twitter.com/5J1kVtzs2d

— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) May 28, 2021

 

या पद्धतीत लोक स्वतः चाचणी करु शकतात, कारण यात स्वतः नमुने गोळा करण्यास संमती आहे. ही पद्धत पर्यावरण स्नेही देखील आहे कारण त्यात कमीतकमी कचरा निर्माण होतो, असे डॉ. खैरनार म्हणाले.

ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये चाचण्यांसाठी वरदान

• ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये, जिथे पायाभूत सुविधांची कमतरता आहे, तिथे चाचण्यांसाठी ही अभिनव चाचणी प्रक्रिया विशेष उपयुक्त ठरेल.
• या तंत्रज्ञान-विरहित (non-technique) चाचणी पद्धतीला आयसीएमआर म्हणजेच, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेची मान्यता मिळाली आहे.
• हे तंत्रज्ञान देशभरात सगळीकडे वापरता यावे, यासाठी नीरीने या चाचण्यांचे प्रशिक्षण इतर प्रयोगशाळांमधील तंत्रज्ञाना द्यावे, असेही त्यांना सांगण्यात आले आहे.

 

नागपुरात मिठ गुळणी चाचण्यांना सुरुवात

नागपूर महानगरपालिकेनेही,या पद्धतीनुसार चाचण्या करण्यास परवानगी दिली आहे, त्यानुसार, मान्यताप्राप्त प्रोटोकॉलनुसार, नीरीने चाचण्या घेणे सुरु केले आहे.

 

“देशभरात हे तंत्रज्ञान वापरण्याची गरज”

नीरीच्या पर्यावरणीय विषाणू विभागातील सर्व शास्त्रज्ञ, संशोधक आणि तंत्रज्ञासह इतर सर्व कर्मचारी आणि प्रयोगशाळा सहाय्यकांनी अत्यंत कठोर परिश्रम केले आहेत. विदर्भात रुग्णसंख्या वाढली असतांना त्यांच्या अथक प्रयत्नांतूनच हे पर्यावरणपूरक, रुग्णस्नेही तंत्रज्ञान विकसित होऊ शकले. जर या पद्धतींचा वापर राष्ट्रीय पातळीवर करण्यात आला, तर लोकांना जलद, नागरिकस्नेही, आणि लवकरात लवकर निष्कर्ष शोधून देता येईल,अशी पद्धत मिळू शकेल. यातून आपली कोरोनाविरुध्दची लढाई आणखी बळकट होण्यास मदत होईल.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: @PIBMumbaicorona testCSIRnagpurनागपूर महानगरपालिका
Previous Post

पर्यावरण आणि पृथ्वीसाठी बॉलिवूड सेलिब्रिटींचा म्युझिक व्हिडीओ

Next Post

“तिसऱ्या लाटेत मुलांना अधिक बाधा होणार हा केवळ अंदाज आहे, त्याची भीती अनाठायी!”

Next Post
corona mpact on children

"तिसऱ्या लाटेत मुलांना अधिक बाधा होणार हा केवळ अंदाज आहे, त्याची भीती अनाठायी!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!