मुक्तपीठ टीम
मुंबईतील स्टार्टअप क्यूआर डॉट एआयने आर्टिफिशिअल इंटेलिजंटसोबत एक एक्स-रे तंत्रज्ञान विकसित केली आहे. हे एक्स-रे तंत्रज्ञान टीबीसोबतच कोरोना संसर्ग असल्यास त्याचीही माहिती देते. नेचर जनरलमधील प्रकाशित शोध अहवालानुसार हा एआय आधारित चेस्ट एक्स-रे आहे, जो सिटीस्कॅन आणि एमआरआय यांसारख्या तपासाचे निकाल देतो.
हे तंत्रज्ञान फुफ्फुसांची तपासणी करून एआयच्या मदतीने कोरोनाव्हायरसची तपासणी करण्यास मदत करते. याव्यतिरिक्त टीबी, क्रॉनिक पल्मोनरी डिसीज, कार्डियक डिसऑर्डर आणि फुफ्फुस डॅमेजबद्दलची माहिती देते. कोरोनाव्हायरस सोबत संक्रमित झालेल्या रुग्णांचे फुफ्फुसे पूर्णपणे प्रभावित होतात. श्वास घेण्यास त्रास होणे हे सामान्य लक्षणं आहे. परंतु फुफ्फुसांमध्ये होणारे बदल हे विषाणूचा इशारा देतात.
स्टार्टअपचे सीइओ प्रशांत वारियरच्या म्हणण्यानुसार, या तंत्रज्ञानाच्या मदतीने रेडियोलॉजिस्ट आणि कोरोनाव्हायरसच्या संक्रमणाची माहिती लगेच डॉक्टरांना समजते. कोरोनाव्हायरससाठी पुरेसे चाचणी किट नसल्यामुळे हे तंत्र या वेळी वापरले जाऊ शकते. देशाच्या बर्याच भागात राज्य सरकारने रुग्णालयांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे व स्वआधारित तपासणी केली जाऊ शकते.
रुग्णांवर नजर ठेवणारे ॲप
• क्यूअर डॉट एआय स्टार्टअपने क्यूएससीओयूटी नावाचे अॅपही विकसित केले आहे.
• जे आरोग्य कर्मचार्यांना अनेक प्रकारची महत्वाची माहिती देते.
• हे कोरोना रुग्णांची नोंद ठेवते.
• हे मोबाईल आणि संगणक अशा दोन्ही डिव्हाइसवर वापरता येते.
• हे अॅप आपल्या संपर्कातील रूग्णांवर देखरेख ठेवते.
• अॅप त्यांच्या लक्षणांवर देखील नजर ठेवते.
• ते रुग्णालयात गेले आहेत की नाही याची माहिती देखील देते.
पाहा व्हिडीओ: