मुक्तपीठ टीम
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होऊ लागल्याने, राज्यात सरकारकडून आणखी निर्बंध शिथिल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुकानांच्या वेळांमध्ये बदल, मुंबई लोकलबाबतही निर्णय होण्याची शक्यता आहे. याबाबत राज्य सरकार लवकरच निर्णय घेण्याच्या शक्यता आहे. विदर्भ कोरोनामुक्तीकडे चाललेला असताना बीड वगळता मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रही अधिक शिथिलतेच्या अपेक्षेत आहे.
देशातील कोरोनाच्या दुसर्या लाटेचा कहर ओसरत झाल्यानंतर बहुतेक राज्यांमध्ये अनलॉक सुरू झाले आहे. जरी अशी काही राज्ये आहेत जिथे निर्बंध शिथिल केले गेलेले नाहीत. कोरोनामुळे सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रात नवीन रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. हे लक्षात घेता, कोरोना प्रकरणांवर लक्ष ठेवणाऱ्या राज्याच्या सल्लागारांनीही निर्बंधांमध्ये आणखी शिथिलता आणण्याची शिफारस केली आहे.
दुकानांमधील कर्मचाऱ्यांचे लसीकरण
कोरोना व्यवस्थापनातील राज्य सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी सांगितले की, कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे. आता दुकानांमध्ये काम करणाऱ्यांच्या लसीकरणावर भर दिल्यास दुकानांच्या वेळा वाढविण्यात येऊ शकतात.
दुकानाच्या वेळा वाढवणार
आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले होते की, ज्या जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आलेली आहे, अशा जिल्ह्यात सर्व दुकाने संध्याकाळी सात वाजेपर्यत उघडी ठेवण्यास परवानगी दिली जाऊ शकते. यामध्ये ०.१ ते ०.२ टक्के पर्यंतचा पॉझिटिव्ह दर असणाऱ्या जिल्ह्यांचा समावेश असेल. अर्थात याबद्दल अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील.
लोक प्रवासावर निर्णय
कोविड टास्क फोर्सच्या एका सदस्याने सांगितले की लसींचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याचा विचार सरकार करत आहे. याबाबात लवकर निर्णय घेण्यात येईल. कोरोनाच्या कठोर मार्गदर्शक सूचनांसह उपनगरी सेवा हळूहळू सुरु केल्या जाऊ शकतात.