मुक्तपीठ टीम
नाशिकमध्ये लवकरच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु होणार आहे. या संमेलनात सहभागी होण्यासाठी कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे. किमान कोरोना लशीचा पहिला डोस तरी घ्यावा लागेल नाहीतर संमेलनस्थळी प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आधीच केल्याने संसर्गाची भीती कमी झाली आहे. तर दुसरीकडे भाजप नेत्यांची नावे कार्यक्रम पत्रिकेत नसल्याने महापौर सतीश कुलकर्णी यांनी संमेलनावर बहिष्कार घातला आहे. आमच्या नेत्यांची नावे मुद्दाम वगळण्याचा आरोप त्यांनी केला आहे. ग्रंथदिंडीव्यतिरिक्त कोणत्याही कार्यक्रमांना हजेरी लावणार नसल्याचे म्हटले आहे.
कोरोना नियमांचे करावे लागेल पालन
- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात लस न घेतलेल्याना प्रवेश देण्यात येणार नाही आहे.
- यापूर्वीही संसर्गवाढीच्या धोक्यामुळे हे संमेलन पुढे ढकलावे लागले होते.
- १८ वर्षांखालील व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे सरकारचे धोरण नाही.
- त्यामुळे या वयोगटातील व्यक्तींना संमेलनस्थळी खुला प्रवेश असेल.
- इतरांसाठी मात्र ‘लस नाही, प्रवेश नाही’ ‘नो व्हॅक्सिन नो एंट्री’चे धोरण आहे.
- एक डोस घेतलेल्या व्यक्तीला तसा पुरावा दाखवावा लागेल.
- संमेलनस्थळी मास्क, सुरक्षित अंतर, सॅनिटायजेशनसारख्या नियमांचे पालन होईल अशी हमी आयोजकांनी दिली आहे.
भाजपाला डावल्याने महापौर सतीश कुलकर्णी नाराज
- साहित्य संमेलनात आघाडीचे नेते आघाडीवर राहणार आहेत.
- केंद्रीय मंत्री भारती पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना साधे संमेलनाचे निमंत्रणही देण्यात आलेले नाही.
- संमेलनासाठी निधी देणाऱ्या भाजपाच्या तिन्ही आमदारांचा निमंत्रण पत्रिकेत साधा उल्लेखही नाही.
- महापालिकेत सध्या भाजपाची सत्ता आहे.
- महापालिकेनेही संमेलनासाठी २५ लाखांचा घसघशीत निधी दिली आहे.
- त्यानंतरही भाजपा नेत्यांना डावलल्याने महापौर सतीश कुलकर्णी नाराज झाले आहेत.
निमंत्रकांनी महापौरांची सपशेल माफी मागितली
- महापौरांना सोमवारी निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर यांनी निमंत्रण पत्रिका दिला.
- यावेळी त्यांच्यासोबत संजय करंजकरही होते.
- पत्रिका पाहताचा महापौरांनी निमंत्रकांना खडेबोल सुनावले.
- भाजपच्या आमदारांपासून आम्ही महापालिकेने निधी दिला.
- मात्र, तुम्ही आमच्या पक्षाचे कुणाचेही नाव निमंत्रण पत्रिकेमध्ये टाकले नाही.
- केंद्रीयमंत्री, विरोधी पक्षनेत्यालाही निमंत्रण दिले नाही, याबद्दल नाराजी व्यक्त केली.
- त्यानंतर निमंत्रक जातेगावकर यांनी महापौरांची सपशेल माफी मागितल्याचे समजते.