मुक्तपीठ टीम
दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळला आहे. यामुळे जगभर कमालीची सावधगिरी बाळगली जात आहे. कोरोनातून जग सावरत असतानाच युरोपातील देशांमध्ये पुन्हा कोरोनानं डोकं वर काढलं. त्यात आता कोरोनाच्या या नवीन प्रकारामुळे घबराट पसरली आहे. ब्रिटनने सहा आफ्रिकन देशांमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. भारतात सध्या तरी अशी बंदी नसून कडक लक्ष ठेवले जात असून चाचण्या केल्या जात आहेत. जागतिक माध्यमांमध्ये प्रकाशित झालेल्या बातम्यांनुसार, तज्ज्ञांच्या मते उपचार न केलेल्या एचआयव्ही-एड्स रुग्णापासून हा नवा व्हेरिएंट विकसित झाला असावा, अशी शक्यता आहे.
दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाच्या नवीन प्रकारातून कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची बातमी समोर आल्यानंतर जगातील अनेक देशांनी अलर्ट जारी केला आहे. ब्रिटनने गुरुवारी सहा आफ्रिकन देशांमधून येणारी उड्डाणे तात्पुरती स्थगित केली. त्या देशाचे आरोग्य सचिव साजिद जाविद यांनी माध्यमांनी ही माहिती दिली.
नव्या व्हेरिएंटमुळे अनेक बदलांची भीती!
- कोरोनाचा B.1.1.529 हा नवा प्रकार तीसपेक्षा जास्त उत्परिवर्तनांसह दक्षिण आफ्रिकेत पसरत आहे.
- यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सीच्या मते, या प्रकारामध्ये मोठ्या प्रमाणात स्पाइक प्रोटिन उत्परिवर्तन तसेच व्हायरल जीनोमच्या इतर भागांमध्ये उत्परिवर्तन समाविष्ट आहे.
- हे संभाव्य जैविकदृष्ट्या महत्त्वाचे उत्परिवर्तन आहेत जे लस, उपचार आणि संसर्गाच्या संदर्भात विषाणूचे वर्तन बदलू शकतात.
दक्षिण आफ्रिकेनंतर बोत्सवाना, हाँगकाँगमध्येही नव्या व्हेरिएंटचा संसर्ग!
- झपाट्याने पसरणारा कोरोनाचा नवीन प्रकार, दक्षिण आफ्रिकेनंतर बोत्सवाना, हाँगकाँगमध्येही आढळला संसर्ग
- कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरिएंटमुळे अनेक देशांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
- दक्षिण आफ्रिकेत सापडलेला नवीन व्हेरिएंट झपाट्याने पसरत आहे.
- दक्षिण आफ्रिकेपाठोपाठ बोत्सवाना आणि हाँगकाँगमध्येही या प्रकाराची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत.
B.1.1 कोरोना व्हेरिएंट उपचार न झालेल्या एचआयव्ही रुग्णांपासून?
- कोरोना विषाणूच्या नवीन प्रकाराला B.1.1 असे नाव देण्यात आले आहे, जो आता अनेक देशांमध्ये पसरत आहे.
- उपचार न केलेल्या एचआयव्ही-एड्स रुग्णापासून ते विकसित झाले असावे असा संशय आहे.
- लंडनमधील यूसीएल जेनेटिक्स इन्स्टिट्यूटचे संचालक फ्रांकोइस बॅलॉक्स यांनी म्हटले आहे की तीव्र संसर्गाच्या काळात ते विकसित होण्याची शक्यता असते.
- या टप्प्यावर संसर्ग किती पसरू शकतो याचा अंदाज लावणे फार कठीण आहे. B.1.1 प्रकारावर अजून संशोधनाची गरज आहे.
- त्याची लागण झालेल्या रुग्णांवर बारकाईने निरीक्षण आणि विश्लेषण करणे आवश्यक आहे.
B.1.1 व्हेरिएंटमुळे १२००हून अधिक संक्रमित झाले आहेत!
- आतापर्यंत, दक्षिण आफ्रिका, बोत्सवाना आणि हाँगकाँगमध्ये कोरोना विषाणूच्या या प्रकाराने संक्रमित रुग्णांची संख्या बाराशेच्या पुढे गेली आहे आणि ही आकडेवारी वेगाने वाढत आहे.
- संशोधकांचे म्हणणे आहे की सध्याची कोरोना लस कोरोना विषाणूच्या या प्रकारावर काम करेल की नाही याबद्दल काहीही सांगणे खूप लवकर आहे.