Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नऊ महिन्यात महाराष्ट्रात कोरोनाने १०५ पत्रकारांचे बळी! सरकारने पत्रकारांना वाऱ्यावर सोडले!!

मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुखांचा आरोप

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
repoter (1)

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रात ऑगस्ट २०२१ ते एप्रिल २०२१ या नऊ महिन्याच्या काळात तब्बल १०५ पत्रकारांचे मृत्यू झाले असून १५०० पेक्षा जास्त पत्रकार कोरोनानं बाधित झाले आहेत .. दुसऱ्या लाटेत हा मृत्यूदर चिंता वाटावी एवढा वाढला.. १ एप्रिल ते २२ एप्रिल या २२ दिवसात राज्यात तब्बल ३४ पत्रकारांचे मृत्यू झाले आहेत.. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी आज ही माहिती एका प़सिध्द पत्रकाव्दारे दिली आहे.

गुरुवारी एकाच दिवशी राज्यातील तीन मान्यवर पत्रकारांचे निधन

धक्का बसावा, मन बैचेन व्हावं अशा बातम्या येत आहेत.. आज राज्यातील तीन ज्येष्ठ व मान्यवर पत्रकारांचे कोरोनानं निधन झालं..
उस्मानाबाद येथील समय सारथीचे संस्थापक, उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार मोतीचंद बेदमुथा यांचं आज कोरोनानं हैदराबाद येथे निधन झाले..
लोकसत्ताचे श्रीरामपूर येथील पत्रकार अशोक तुपे यांचंही आज निधन झाले.. अगोदर त्यांना कोरोना झाला होता, मात्र त्यातून ते बरे झाले होते. मात्र आज त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली..
ठाणे येथील वरिष्ठ पत्रकार सोपान बोंगाणे यांचंही आज कोरोनानं निधन झालं.

  • तीनही मित्रांना भावपूर्ण श्रद्धांजली
  • राज्यात कोरोनानं बळी घेतलेल्या पत्रकारांची संख्या आता 105 झाली आहे..
  • दर दोन दिवसाला तीन पत्रकारांचे कोरोनाने बळी

महाराष्ट्रात दर दिवसाला सरासरी दीड पत्रकाराचे बळी कोरोनानं जात असल्याची धक्कादायक आकडेवारी देखील एस.एम.देशमुख यांनी दिली आहे..
मराठी पत्रकार परिषदेने १ ऑगस्ट २०२० पासून पत्रकारांबददलची माहिती संकलित केली आहे.. ऑगस्ट २०२० ते १५ फेब़ुवारी २०२१ या साडेसहा महिन्याच्या काळात जवळपास पन्नास पत्रकारांचे कोरोनाने निधन झाले.. मात्र फेब्रुवारी नंतर आलेल्या दुसरया लाटेत बाधित पत्रकारांची संख्या जशी वाढली तद्वतच मृत्यूचे प्रमाण देखील वाढले.. मराठी पत्रकार परिषदेकडे उपलब्ध आकडेवारीनुसार १६ फेब्रुवारी २०२१ ते १७ एप्रिल २०२१ या दोन महिन्यात तब्बल ५६ पत्रकारांचे मृत्यू झाले.. त्यातही एप़िल हा महिना पत्रकारांसाठी अधिक तापदायक ठरला.. कारण १ एप़िल ते १८ एप्रिल या १८ दिवसात राज्यात तब्बल ३० पत्रकारांचे निधन झाले आणि दोन पत्रकारांनी आत्महत्या केल्या.. राहुरीतील एका पत्रकाराची याच कालावधीत हत्या देखील झाली.. १५ एप़िल हा दिवस तर अधिक वाईट ठरला.. या दिवशी राज्याच्या वेगवेगळ्या भागात तब्बल ५ पत्रकारांचे एकाच दिवशी मृत्यू झाले..एप़िल मधील १८ दिवसांचा विचार केला तर राज्यात दर दिवशी सरासरी दीड पत्रकाराचा मृत्यू झाला असे म्हणता येईल..ही आकडेवारी धक्कादायक असली तरी प्रत्यक्षात यापेक्षा जास्त पत्रकारांचे मृत्यू झालेले असू शकतात कारण काही आकडे परिषदे पर्यत पोहचू शकलेले नाहीत.

repoter (3)

तरूण पत्रकारांची संख्या जास्त

पहिल्या लाटेत ज्या पत्रकारांचे मृत्यू झाले त्यातील बहुसंख्य पत्रकार ५५ ते ६५ या वयोगटातील होते.. मात्र दुसरया लाटेत मृत्युमुखी पडलेले बहुसंख्य पत्रकार ३५ ते ५० वयोगटातील आहे.. काल मृत्युमुखी पडलेल्या नागपूरच्या अंकित डा चं वय केवळ ३१ वर्षांचं होतं.. बाधित होणारया पत्रकारांमध्ये देखील तरूण पत्रकार अधिक असल्याने सर्व वयोगटातील पत्रकारांना लस द्यावी यासाठी मराठी पत्रकार परिषदेने इ-मेल पाठवा आंदोलन केले होते मात्र उध्दव ठाकरे यांना या आंदोलनाची दखल घ्यावी असे वाटले नाही.. आपल्या कामासाठी तरूण पत्रकारांना सतत बाहेर भटकावे लागते, लोकांना भेटावे लागते त्यामुळे त्यांना इन्फेक्शन होण्याची जास्त शक्यता असते..आणि म्हणूनच या वयोगटातील पत्रकारांना प्राधांन्याने लस द्यावी असा मराठी पत्रकार परिषदेचा आग़ह आहे..

दोन पत्रकारांच्या आत्महत्या

कोरोनामुळे अनेक पत्रकारांच्या नोकरया गेल्या, त्यामुळे पत्रकार आर्थिक विवंचनेत अडकले.. त्यातच जे पत्रकार किंवा त्यांचे कुटुंबिय बाधित झाले त्यांच्या दुख:ला सीमा राहिली नाही.. सोलापूरचे तरूण पत्रकार प्रकाश जाधव यांचे वडिल कोरोनानं गेले, आई आणि भाऊ पॉझिटिव्ह, स्वतःघरीच क्वारंटाइन अशा स्थितीत आर्थिक चणचण आणि औषधंही मिळत नसल्याने या सर्व त्रासाला कंटाळून प़काश जाधव यांनी आत्महत्या केली..
परभणीचे अरूण हिस्वणकर हे देखील आर्थिक अडचणीत सापडल्याने त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.. या दोन्ही घटना माध्यमातील अस्वस्थतः दर्शविणाऱ्या आहेत

repoter (2)

सरकारचे पत्रकारांकडे दुर्लक्ष

मयत पत्रकारांच्या नातेवाईकांना ५० लाख रूपयांची मदत करण्याची आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलेली घोषणा हवेतच विरली.. 50 लाख राहू द्या, केद़ाच्या धर्तीवर किमान ५ लाख रूपये तरी द्या या मागणीवर ही मुख्यमंत्री मौन घरून आहेत.. सर्व वयोगटातील पत्रकारांना लस द्या, पत्रकारांसाठी एक बेड राखीव ठेवा या आवश्यक मागण्यांकडे देखील सरकार दुर्लक्ष करीत असल्याने पत्रकारांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असल्याचा आरोप एस.एम.देशमुख यांनी केला आहे..माथेरानचे पत्रकार संतोष पवार आणि पुण्याचे पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू शासकीय यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे झाला होता.. या दोन्ही घटनांच्या चौकशीचे आदेश सरकारने दिले होते पण एक वर्ष होत आले तरी ना चौकषीचे निष्कर्ष समोर आले ना मृत्यूस जबाबदार असलेल्या व्यक्तींवर काही कारवाई झाली त्याबद्दलही पत्रकारांमध्ये मोठी नाराजी आहे..
थोडक्यात सरकारने पत्रकारांना वारयावर सोडले आहे, सरकार पत्रकारांचे कोणतेच प्रश्न सोडवत नसल्याबद्दल महाराष्ट्रातील माध्यम जगतात मोठा संताप आणि असंतोष आहे..


Tags: coronajournalistsपत्रकारमहाराष्ट्र
Previous Post

आज ६६ हजार ८३६ नवे रुग्ण! ७४ हजार बरे झाले! मृत्यूचा आकडाही वाढला!

Next Post

“प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना पुन्हा सुरू, दोन महिने ५ किलो अतिरिक्त धान्य”

Next Post
chhagan bhujbal

"प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना पुन्हा सुरू, दोन महिने ५ किलो अतिरिक्त धान्य"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!