मुक्तपीठ टीम
कोरोना महामारी ही मानवजातीसाठी भीषण जीवघेणी आपत्ती ठरत आहे. आजवर कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या ही ५० लाखांच्या पुढे गेली आहे. ताज्या माहितीनुसार, अर्ध्या कोटी माणसांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेल्या या विषाणूचा डेल्टा प्रकार सर्वात जास्त घातक ठरला आहे. त्याच्या कहराने जास्तीत जास्त मृत्यू झाले आहेत. त्यातही महासत्ता असणाऱ्या अमेरिकेत जगातील सर्वाधिक मृत्यू ओढवले आहेत.
अर्धा कोटींचे कोरोनाने बळी!
- जगात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ५० लाखांच्या पुढे गेली आहे. जगातील एकूण अर्धा कोटी मृत्यूंपैकी सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत कोरोनामुळे मृतांची संख्या आता सात लाखांच्या पुढे गेली आहे.
- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या अमेरिकेत लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाले आहे.
- तरीही गेल्या एका आठवड्यात दररोज दोन हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूची प्रकरणे आणि मृत्यू या दोन्ही बाबतीत अमेरिका सध्या पहिल्या क्रमांकावर आहे.
- जगभरात कोरोनाचे १९ टक्के रुग्ण अमेरिकेत आहेत, त्याचबरोबर १४ टक्के मृत्यूही अमेरिकेतच झाले आहेत.
कोरोनाच्या डेल्टा विषाणूने केला घात
- सध्या सुरु असलेला कोरोनाचा कहर हा डेल्टा प्रकारामुळे आहे.
सप्टेंबरच्या मध्यात डेल्टा व्हेरिएंटची प्रकरणे त्यांच्या सर्वकालीन उच्चतम पातळी वरून खाली आली आहेत. - तरीही अनेक देशांमध्ये कोरोनाबाधितांची लोकांची संख्या सतत वाढत आहे. कोरोना मृत्यूंची संख्या २५ लाखांवर पोहोचण्यास एक वर्ष लागले, तर पुढील २५ लाख मृत्यू १३० दिवसांच्या आधी म्हणजे २३६ दिवसात झाले.