Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पुरुषांच्या लैंगिक जीवनावरही कोरोनाचा परिणाम होतो का?

June 5, 2021
in आरोग्य
0
corona

मुक्तपीठ टीम

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत त्याच्या दुष्परिणामांबद्दल नव्या गोष्टी समोर येत आहेत. आता नव्या संशोधनात असे दिसून आले आहे की कोरोनामुळे पुरुषांच्या लैंगिक जीवनावरही परिणाम होत आहे. एका अभ्यासात केलेल्या दाव्यानुसार, कोरोनामुळे पुरुषांमध्ये लिंग शिथिलतेची समस्या दिसून येत आहे. याचे कारण तणाव, नैराश्यासह काही प्रमाणात शरीरात होणारे बदल हेही असल्याचे सांगितले जात आहे.

 

कॅलिफोर्निया विद्यापीठाचे युरोलॉजिस्ट डॉ. हॉवर्ड ऑबर्ट यांनी तयार केलेला अभ्यास अहवाल मेन्स हेल्थ या नियतकालिकात प्रकाशित झाला आहे. तो नेमका काय आहे, ते जाणण्यापूर्वी लिंग ताठरतेची प्रक्रिया समजून घ्यावी लागेल. अर्थात यामुळे होणारे दुष्परिणाम स्थायीच असतील असे नाही.

 

लिंग शिथिलता म्हणजे काय?

  • वास्तविक, पुरुषाचे लिंग हे तीन सिलिंडरद्वारे बनलेले असते.
  • वरचे दोन सिलिंडर्स स्पंजसारख्या विस्तारित टिश्यूने भरलेले आहेत.
  • त्याच वेळी, खालचे सिलिंडर मूत्राशयातून मूत्र सोडते.
  • जेव्हा एखादी व्यक्ती उत्तेजित होते, तेव्हा ती नसांचा प्रतिसाद आणि त्याद्वारे होणाऱ्या क्रियेमुळे होते.
  • या दरम्यान रक्त स्पंजी टिश्यूमध्ये येते आणि ते पसरतात.
  • शरीराची यंत्रणा अशी आहे की रक्त तिथेच थांबते.
  • मग त्या व्यक्तीला ताठरता जाणवते.
  • यासाठी मज्जातंतूमधून पुरेशा प्रमाणात नायट्रिक ऑक्साईड सोडणे आवश्यक आहे.
  • रक्त वहन होण्यासाठी रक्तवाहिन्या पुरेशी खुल्या असाव्यात.
  • जेव्हा रक्त कोणत्याही कारणास्तव पुरुषाच्या लिंगापर्यंत पोहोचू शकत नाही, तेव्हा त्यास ताठरता येत नाही आणि त्याला लिंग शिथिलता असे म्हणतात.

 

लिंग शिथिलतेची कारणे कोणती असू शकतात?

  • ताण, नैराश्य आणि कार्यक्षमतेशी संबंधित ताणतणाव यासारख्या अनेक कारणांमुळे लिंग शिथिलतेची समस्या उद्भवते.
  • परंतु जर रक्त पुरवठ्यात अडचण येत असेल तर ती ताठरतेवर परिणाम करू शकते.
  • मज्जासंस्थेमध्ये कोणतीही गडबड किंवा हार्मोनशी संबंधित समस्यादेखील यामागील कारणे असू शकतात.
  • सामान्यत: ताठरता थेट रक्त पुरवठ्याशी संबंधित असते आणि यामुळे, ताठरतेच्या क्रियेत कोणतीही गडबड ही हृदयरोगाचे लक्षणही असू शकते.
  • कोरोनामुळे संपूर्ण शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा नीट होत नाही आणि रक्त पुरवठ्याचा थेट परिणाम होतो.
  • पुरुषाच्या लिंगाला रक्तपुरवठा करणार्‍या रक्तवाहिन्या ब्लॉक किंवा अरुंद होऊ शकतात.

 

कसा दुष्परिणाम होतो?

  • जर असे होते आणि रक्त पुरुषाच्या लिंगापर्यंत पोहोचत नसेल आणि तेव्हा लिंग शिथिलतेची समस्या उद्भवू शकते.
  • कोरोनाचा शारीरिक आणि भावनिक आरोग्यासह एखाद्याच्या संपूर्ण आरोग्यावर मोठा परिणाम झाला.
  • शारीरिक व्यायामाचा अभाव, जास्त प्रमाणात खाणे आणि जास्त मद्यपान हे देखील आरोग्य बिघडण्यासाठी कारणीभूत आहे, त्याचा फटका इथेही बसू शकतो.

हे नुकसान कायम आहे की ते बरे करता येते?

  • तज्ज्ञांचे म्हणणे आहे की कोरोनामुळे होणारे काही नुकसान कायमस्वरूपी होत आहेत तर काही तात्पुरते आहेत.
  • लिंग शिथिलता ही कायमसुरुपी आहे की नाही यावर अधिक संशोधन करण्याची आवश्यकता आहे.
  • कोरोनामुळे प्रजननक्षमतेवर परिणाम होईल हे देखील ठामपणे सांगता येत नाही.
  • वय देखील एक घटक असू शकते.
  • वाढत्या वयानुसार, लिंग शिथिलता आणि कोरोनाची तीव्रता या दोन्ही गोष्टींचा धोका आहे.

Tags: coronamaleकोरोनाडॉ. हॉवर्ड ऑबर्टपुरुषलैंगिक जीवन
Previous Post

मराठा आरक्षण प्रकरणी पूनर्विलोकन याचिका दाखल करण्याची शिफारस

Next Post

बाल वैज्ञानिकांची भन्नाट कल्पना, चितेच्या राखेपासून सेंद्रिय खत!

Next Post
Moksha Yantra

बाल वैज्ञानिकांची भन्नाट कल्पना, चितेच्या राखेपासून सेंद्रिय खत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!