Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दिवसा बढती, रात्री स्थगिती! आघाडी सरकारच्या निर्णयाचं गूढ! नवा वाद!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
MVA on Badhati

मुक्तपीठ टीम

एकदा सचिन वाझे तर नंतर परमबीर सिंह…पोलीस अधिकाऱ्यांमुळे एक नाही तर दोन वेळा आघाडी सरकार संकटात सापडले. तरीही आघाडी सरकारने बुधवारी आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या-बढत्यांचे आदेश जारी केले. बारा तास उलटत नाहीत तोच त्यातील पाच अधिकाऱ्यांच्या बढत्या-बदल्यांना स्थगिती देण्यात आली आहे. गृहमंत्रालयाच्या या आदेश बदलांमागील गूढ आता वादाचा विषय ठरत आहे. भाजपाने आघाडी सरकारचा भ्रष्टाचार उघड झाल्याचा आरोप केला आहे.

मुंबई-ठाणे-पालघरमधील काही अधिकाऱ्यांबद्दलचे निर्णय हे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासारख्या प्रभावशाली मंत्र्याला विश्वासात न घेता घेतल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हस्तक्षेप केल्याचं कळतं. खरंतर यापूर्वीही असं झालं आहे. असे आदेश मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने जारी केले जातात. गृहमंत्री त्यासाठी शिफारस करतात. पण त्याआधी त्यांनी संबंधित नेते, मंत्री यांना विश्वासात घेणे राजकीयदृष्ट्या महत्वाचं असतं. तसं घडत नसल्यानं आधी अनिल देशमुखांच्या कारकीर्दीत आणि आता दिलीप वळसे-पाटील यांच्या कारकीर्दीत पुन्हा बढती-बदली-स्थगितीचा खेळ रंगला आहे.

बढती-बदली-स्थगितीचा खेळ!

  • महाराष्ट्र पोलीस दलातील काही आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढत्यांचा आदेश गृहमंत्रालयाने जारी केले.
  • अवघ्या १२ तासात त्यातील पाच अधिकाऱ्यांच्या बदलीला गृहमंत्रालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे.
  • मुंबईसह ठाण्यातील पोलीस अधिक्षक आणि पोलीस उपायुक्तांसह पाच आयपीएस अधिकाऱ्यांना अप्पर पोलीस आयुक्तपदी बढती दिली होती.

कोणाची बढती-बदली-स्थगिती?

  • राजेंद्र माने राज्य गुप्तवार्ता विभागात उपायुक्त पदावरून ठाणे शहरात पूर्व प्रादेशिक विभागात अप्पर पोलीस आयुक्त म्हणून बढती.
  • महेश पाटील यांना पोलीस उपायुक्त पदावरुन मुंबईतील वाहतूक विभागात अप्पर पोलीस आयुक्त म्हणून बढती.
  • पालघरचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची मुंबईत अप्पर पोलीस आयुक्तपदी (संरक्षण व सुरक्षा) बढती.
  • संजय जाधव पुण्यातील महामार्ग सुरक्षा पथकात पोलीस अधीक्षक पदावरून ठाणे शहरात अप्पर पोलीस आयुक्त (प्रशासन) बढती पंजाबराव उगले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागातून पोलीस मुंबईत अप्पर पोलीस आयुक्तपदी (सशस्त्र पोलीस) बढती.

भाजपाची टीका

  • भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी सरकारवर या आदेश स्थगितीमुळे भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.
  • या सरकारचा बदल्यांमधील भ्रष्टाचार उघड झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात, त्याआधी गृहमंत्र्यांची सही असते.
  • अवघ्या बारा तासात आदेशाला स्थगिती दिली आहे.
  • स्थगिती का दिली याबाबत आघाडी सरकारने खुलासा केला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Tags: BJPCM Udhav thackeraydilip walse patilEknath ShindeIPSआयपीएसएकनाथ शिंदेदिलीप वळसे पाटीलभाजपामुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Previous Post

माध्यम महोत्सव: सृजनशीलतेला बहर, माध्यमांचा इतिहास, ग्लॅमरची साथ!

Next Post

नवी मुंबईत व्यंकटेश्वरा मंदीरासाठी तिरुपती देवस्थानास जमीन देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता

Next Post
maharashtra Cabinet Decision 21-04-22

नवी मुंबईत व्यंकटेश्वरा मंदीरासाठी तिरुपती देवस्थानास जमीन देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!