मुक्तपीठ टीम
सीएसएल अर्थात कोची शिपयार्ड लिमिटेड (CSL) कोची द्वारे निर्माणाधीन अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो क्राफ्ट (ASW SWC)- पाणबुडी अवरोधक उथळ जलस्तरीय सागरयुध्द प्रकल्पाच्या पहिल्या युद्धनौकेच्या(BY 523, Mahe) बांधणीच्या कार्याला ३० ऑगस्ट २२ रोजी वाईस एडमिरल (VAdm)किरण देशमुख, सीडब्ल्यूपीअँडए (CWP&A), यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. यावेळी सीएमडी, सीएसएल (CMD, CSL) मधु एस नायर, डब्ल्यूपीएस (कोची) WPS (Koc) कमांडर गणपती, सीएसएल चे संचालक आणि इतर वरिष्ठ अधिकारी तसेच नौदलातले संचालक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/Pics(1)772H.JPG
याप्रसंगी बोलताना, वाईस ऍडमिरल VAdm किरण देशमुख, सीडब्ल्यूपीअँडए (CWP&A), यांनी कोविड मर्यादा आणि परिणामी लॉकडाऊन असूनही हा टप्पा गाठण्यासाठी CSL ने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. त्यांनी ही शिपयार्डची एक उल्लेखनीय कामगिरी असल्याचे म्हटले आणि सर्वांनी दाखवलेल्या व्यावसायिकतेचे कौतुक केले. त्यांनी हेही अधोरेखित केले की, या जहाजांचे बांधकाम हे ‘आत्मनिर्भर भारत’ आणि भारताच्या ‘मेक इन इंडिया’ वचनबद्धतेला बळकटी देणारे आहे. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी सूचित केले की, जहाज बांधणी प्रक्रियेत हा पहिला टप्पा हा मैलाचा दगड ठरणार आहे आणि यामुळे पूर्णपणे बांधलेल्या जहाजाच्या दिशेने विविध विभागांच्या एकत्रीकरणाचा मार्ग मोकळा करतो.
https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/Pics(4)5KFW.JPG
सीडब्ल्यूपीअँडए( CWP&A) पुढे म्हणाले की, हे प्लॅटफॉर्म पाण्याखालील धोके शोधण्याच्या आणि निष्फळ करण्याच्या उद्देशाने किनारी भागात उप-पृष्ठीय पाळत ठेवतील.
या संबोधनादरम्यान, सीएमडी-सीएसएल यांनी हे अधोरेखित केले की कोरोना महामारीमुळे या जटिल जहाजबांधणी प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान अनेक आव्हाने उभी राहिली असूनही, शिपयार्डने नाविन्यपूर्ण उपायांद्वारे जहाजांचे निरंतर उत्पादन सुनिश्चित केले आहे. त्यांनी भारतीय नौदलाच्या अथक पाठिंब्याबद्दल आभार मानले आणि दर्जेदार जहाजे वेळेवर पोहोचवण्याच्या शिपयार्डच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.