Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अयोध्या राम मंदिर: वेगानं बांधकाम सुरु! पायात सात हजार दगडांचा वापर!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या, धर्म
0
ram mandir

मुक्तपीठ टीम

श्री राम जन्मभूमी अयोध्येतील राम मंदिराचे काम अगदी वेगाने सुरू आहे. राम मंदिराचे ३५ टक्के काम पूर्ण झाले आहे. सध्या मंदिर उभारणीचा तिसरा टप्पा सुरू आहे. यामध्ये प्रभू रामाच्या गर्भगृहाला आकार देण्याचे काम केले जात आहे. गर्भगृहासोबतच मंडप आणि संरक्षक भिंतीचे कामही सुरू आहे. प्रभू रामाच्या गर्भगृहाचे बांधकाम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ट्रस्टने ठेवले आहे.

प्रभू श्री राम मंदिर उभारणीविषयीचे अपडेट्स

  • मंदिर उभारणीच्या कामासाठी नावाजलेल्या तांत्रिक एजन्सींच्या मार्गदर्शनाखाली मोठमोठ्या मशिन्सद्वारे हे काम केले जात आहे.
  • मंदिर उभारणीचे दोन टप्पे आतापर्यंत पूर्ण झाले आहेत. पहिल्या टप्प्यात राम मंदिराचा ५० फूट खोल पाया तयार करण्यात आला.
  • दुसऱ्या टप्प्यात मंदिराच्या रॉफ्टचे काम पूर्ण झाले.
  • तिसऱ्या टप्प्यात प्रभू रामाच्या गर्भगृहाचे बांधकाम सुरू आहे. अशाप्रकारे आतापर्यंत मंदिर उभारणीचे ३५ टक्के काम पूर्ण झाले आहे.

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य डॉ.अनिल मिश्रा म्हणाले की, “मंदिराच्या पायाचे काम सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल. २१ फूट उंचीच्या मंदिराच्या पायात एकूण १७ हजार ग्रॅनाईटचे दगड बसवले जाणार आहेत. त्यापैकी आतापर्यंत सात हजार दगड बसविण्यात आले आहेत. त्याचबरोबर गर्भगृहात महापीठाची निर्मिती करण्यात येत आहे. जेथे प्रभू रामाला वीराजमान केले जाईल. त्या भागाला महापीठ म्हणतात. महापीठाच्या उभारणीत आतापर्यंत ४२ दगड टाकण्यात आले आहेत.”

नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षणासाठी मंदिराची सुरक्षा

  • दुसरीकडे मंदिराला नैसर्गिक आपत्तीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या सुरक्षा भिंतीच्या पायाभरणीचे काम पूर्ण झाल्यानंतर आता पश्चिम दिशेला भिंत उभारण्याचे काम सुरू झाले आहे.
  • गर्भगृहाचे महापीठ जेथे प्रभू राम चार भावांसह वीराजमान होणार आहे. म
  • महापीठाच्या अगदी वर असलेल्या मंदिराच्या पहिल्या मजल्यावर रामदरबाराची स्थापना करण्यात येणार आहे. ४. दुसरा मजला सध्या रिकामा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मंदिराचा मुख्य दरवाजा गोपुरमच्या आधारावर बांधण्यात येणार

  • राममंदिराचा मुख्य दरवाजा गोपुरमच्या आधारावर बांधला जाणार आहे. मुख्य प्रवेशद्वार पूर्व दिशेला असेल.
  • गोपुरम हे दक्षिण शैलीतील मंदिरांवर बनवले जातात.
  • दक्षिणेकडील मंदिरांच्या प्रवेशद्वाराला गोपुरम म्हणतात. तो पिरॅमिडच्या आकाराचा आहे.
  • राम मंदिराचे प्रवेशद्वारही याच शैलीत बांधले जाईल, उत्तर भारतात त्यांना सिंहद्वार म्हणतात.
  • राम मंदिराच्या प्रवेशद्वारात उत्कृष्ट कलाकुसर आणि नक्षीकाम पाहायला मिळणार आहे. प्रवेश करताच रामायणाचा काळ जाणवेल.
  • रामकथा आणि देवतांच्या चित्रांमुळे दरवाजाची शोभा वाढेल.

Tags: Ayodhya Ram Templegood newsmuktpeethRam Temple Building UpdatesRam temple constructionअयोध्या राम मंदिरघडलं-बिघडलंचांगली बातमीमुक्तपीठराम मंदिर उभारणी अपडेट्सराम मंदिर बांधकाम
Previous Post

पोट साफ, प्रकृती मस्त! पाच सोपे नियम पाळा आणि सुखी राहा…

Next Post

‘अग्निपथ’मुळे आगडोंब: आंदोलनाची धग वाढली, बिहार, यूपी, हरियाणा, पंजाबमध्ये उद्रेक!

Next Post
agnipath Protest

'अग्निपथ'मुळे आगडोंब: आंदोलनाची धग वाढली, बिहार, यूपी, हरियाणा, पंजाबमध्ये उद्रेक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!