Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बहुपत्नीत्व, निकाह-हलाला यावर घटनापीठ सुनावणी करणार

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
supreme court

मुक्तपीठ टीम

मुस्लिमांमध्ये प्रचलित असलेल्या बहुपत्नीत्व आणि निकाह-हलालाच्या प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठ स्थापन करण्यास सहमती दर्शविली आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने गुरुवारी सांगितले की, या पद्धतींना आव्हान देणाऱ्या याचिकेवर विचार करण्यासाठी ते नवीन घटनापीठ स्थापन करतील. ज्येष्ठ वकील अश्विनी उपाध्याय यांच्या याचिकेवर हे निर्देश देण्यात आले आहेत.

या याचिकेत बहुपत्नीत्व आणि हलाला प्रथेवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी आणि न्यायमूर्ती हेमंत गुप्ता हे दोन न्यायमूर्ती निवृत्त झाले असून नवीन खंडपीठाची स्थापना करावी लागेल, असे उपाध्याय यांनी खंडपीठाला सांगितले. यापूर्वीचे पाच न्यायाधीश – न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी, हेमंत गुप्ता, सूर्यकांत, एम.एम. सुंदरेश आणि सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. याचिकेत म्हटले आहे की, निकाह-हलाला प्रथेमध्ये घटस्फोटित महिलेला आधी दुसऱ्याशी लग्न करावे लागते. यानंतर, मुस्लिम कायद्यानुसार, पुनर्विवाह करण्यासाठी पहिल्या पतीपासून घटस्फोट घ्यावा लागतो. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच तिहेरी तलाकची प्रथा बेकायदेशीर घोषित केली आहे. यानंतर केंद्र सरकारने तिहेरी तलाक बेकायदेशीर घोषित केला आणि तसे केल्यास कठोर शिक्षेची तरतूद केली.

मुस्लिमांच्या या प्रथांवर घटनापीठ सुनावणी करणार!!

  • बहुपत्नीत्व – पुरुषांना एकाच वेळी ४ विवाह करण्याची परवानगी.
  • निकाह हलाला – घटस्फोटित मुस्लीम महिलेला तिच्या पतीशी पुनर्विवाह करण्यासाठी आधी दुसऱ्या पुरुषाशी लग्न करावे लागते, शारीरिक संबंध ठेवावे लागतात. त्यानंतर नवीन पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर, पहिल्या पतीशी लग्न करता येते.
  • निकाह – ए – मुतह – शिया मुस्लिमांच्या एका वर्गामध्ये प्रचलित असलेला करार विवाह. यामध्ये विवाह निश्चित वेळेसाठीच होतो. यानंतर महिला आणि तिच्या मुलांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी तिच्या पतीची राहत नाही.
  • निकाह – ए – मिस्यार – सुन्नी मुस्लिमांच्या एका गटात करार विवाह वैध आहे.

Tags: CJI D Y ChandrachudHalalamuslimNikahSupreme Courtनिकाहमुस्लिमसरन्यायाधीश डीवाय चंद्रचूडसर्वोच्च न्यायालयहलाला
Previous Post

संविधान दिनानिमित्त ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ई. झेड. खोब्रागडे यांचे व्याख्यान

Next Post

कृषी योजनांच्या केंद्राकडील निधीसाठी भरीव पाठपुरावा करावा- कृषी मंत्री अब्दुल सत्तार

Next Post
Agriculture Scheme

कृषी योजनांच्या केंद्राकडील निधीसाठी भरीव पाठपुरावा करावा- कृषी मंत्री अब्दुल सत्तार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!