मुक्तपीठ टीम
महागाईचा भडका दिवसेंदिवस अधिकच वाढतो आहे. जनतेच्या खिशाला पेटवतो आहे. आता खिशाला भोकं नाही तर वणवाच लागल्यासारखे होत आहे. तर दुसरीकडे मात्र हीच महागाई सरकारची तिजोरी भरत आहे. कारण महागाईतही सरकारला बक्कळ फायदा होताना दिसत आहे. एप्रिलमध्ये जीएसटीमधून विक्रमी १ लाख ६७ हजार ५४० कोटी कमावण्याचे महागाई हेही एक कारण सांगितले जात आहे.
महागाई आणि सरकारची भर…
- ज्या महिन्यात महागाई जास्त असते, त्या महिन्यात जीएसटी संकलनही जास्त असते.
- मार्चमध्ये घाऊक महागाई १४.५५ टक्के होती.
- जीएसटी संकलन विक्रमी १.४२ लाख कोटी होते.
उपकरातून १० हजार ६४९ कोटी उभारले
- केंद्रीय जीएसटी ३३,१५९ कोटी रुपये
- राज्य जीएसटी ४१ कोटी ७९३ कोटी रुपये
- एकात्मिक जीएसटी ८१ हजार ९३९ कोटी रुपये
- आयजीएसटी ३६,७०५ कोटी
- उपकराचा वाटा १०,६४९ कोटी रुपये
एकूणच अर्थ अभ्यासकांचे अनुभव हेच सांगतात की जेव्हाही महागाई वाढते, सर्वसामान्यांचे जीवन होरपळते तेव्हा तेव्हा सरकारची तिजोरी मात्र तुडुंब भरते. अर्थातच वाढती महागाई ही कोणत्याही सरकारसाठी आनंदाची बाब नसली तरी कर संकलन कसं वाढवलं याचे दावे करण्याची संधी देणारी मात्र ठरते.