Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महिला काँग्रेस तर्फे राज्यभर गॅस दरवाढ व महागाई विरोधात आंदोलन

प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी केला मोदी सरकारचा निषेध

January 17, 2022
in घडलं-बिघडलं
0
Congress Womens protest against gas price hike and inflation

मुक्तपीठ टीम

घरगुती गॅस व जीवनाश्यक वस्तूंची भरमसाठ भाववाढ करणा-या केंद्रातील भाजप सरकारविरोधात महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने आज राज्यभर आंदोलन करण्यात आले. प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथे महिलांनी आंदोलन करून मोदी सरकारचा निषेध केला.

 

स्वयंकाच्या गॅसच्या वाढलेल्या किंमती विरोधात महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस आक्रमक झाली असून. आज राज्यातील सर्व जिल्ह्यात महिला काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथे आंदोलन करण्यात आले. माजी मंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तसेच पुणे काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आ. मोहन जोशी महिला काँग्रेसच्या संगीता तिवारी, उज्ज्वला साळवे, अस्मिता शिंदे, शोभा पनीकर, इंदिरा आहिरे, सुजाता चिन्ता, लताताई राजगुरू, सुजाता शेट्टी, स्वाती शिंदे, वैशाली मराठे, पल्लवी सुरसे, सीमा सावंत यांच्यासह महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या

 

यावेळी बोलताना संध्याताई सव्वालाखे म्हणाल्या की, सत्तेवर आल्यावर १०० दिवसांत महागाई करून असे आश्वासान नरेंद्र मोदींनी दिले होते पण सत्तेवर येऊन सात वर्ष झाल्यानंतरही ते महागाई कमी करू शकले नाहीत. किंबहुना ते सत्तेवर आल्यापासून दररोज महागाई वाढतच चालली आहे. इंधन व गॅस दरवाढीमुळे महागाई प्रचंड प्रमाणात वाढल्याने महिलांचे किचन बजेट कोडमडले आहे. उज्वला गॅसची सबसिडी कमी केल्याने गरीब महिलांना गॅस सोडून पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे महिला उज्ज्वला योजनेचे गॅस सिलेंडर परत करून मोदी सरकारचा निषेध करत आहेत.

 

यावेळी बोलताना महिला काँग्रेसच्या पुणे शहर अध्यक्ष पूजा आनंद म्हणाल्या की, मोदी सत्तेवर आल्यापासून सातत्याने वाढणा-या महागाईमुळे महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. महिलांनी चुल सोडून गॅसचे कनेक्शन घेतले पण सिलेंडरचे दर १००० रुपयांवर गेल्यामुळे त्यांना पुन्हा चुलीकडे वळण्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्यामुळे महिलां मध्ये प्रचंड आक्रोश असून देशातील महिला मोदींनी धडा शिकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत.


Tags: Gas price hikeinflationMahila Congressगॅस दरवाढमहागाईमहिला काँग्रेस
Previous Post

एन.डी.पाटील: जीवन समाजासाठी, सतत संघर्ष सामान्यांसाठी! आपल्या मातीतील, आपलं आदर्शवादी नेतृत्व!

Next Post

सटाण्यातील भाजपा पदाधिकारी व मनमाड मधील सामाजिक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Next Post
BJP office bearers and social workers from Manmad join NCP

सटाण्यातील भाजपा पदाधिकारी व मनमाड मधील सामाजिक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!