Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सायकलीला हाताचा आधार! अखिलेश यादवांविरोधात काँग्रेसचा उमेदवार नसणार!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
up election

मुक्तपीठ टीम

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगू लागला आहे. येत्या १० फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या पहिल्या टप्प्यासाठी वेगवान हालचाली सुरु आहेत. गेल्या निवडणुकीत एकत्र लढलेले सपा आणि काँग्रेस यावेळी एकमेकांविरोधात लढत आहेत. मात्र, समान शत्रू असणाऱ्या भाजपाविरोधात काही ठिकाणी वेगळी रणनीतीही दिसत आहे. याचाच एक भाग म्हणून समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादवांविरोधात काँग्रेसने उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच अखिलेश यादव यांचे काका शिवपाल यादव लढत असलेल्या जसवंतनगरमध्येही काँग्रेसने आपला उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

अखिलेश यादव यांच्याविरुद्ध काँग्रेसचा एकही उमेदवार नाही

  • काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठी आणि रायबरेलीमध्ये समाजवादी पार्टी गांधी कुटुंबाविरुद्ध आपले उमेदवार उभे करत नाही.
  • याआधीही काँग्रेसने मुलायमसिंह यादव आणि अखिलेश यांच्या विरोधात आपला उमेदवार उभा केला नव्हता.
  • काँग्रेसने करहाल जागेसाठी आधीच उमेदवार जाहीर केला होता, कारण तोपर्यंत सपाने अखिलेश यादव यांना करहाल मतदारसंघातून उमेदवारी दिली नव्हती.
  • पक्षाने येथून ज्ञानवती यादव यांना तिकीट दिले होते, मात्र आता त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे.
  • या जागेवर तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे.

 

काँग्रेसही देत नाही सपा, रालोद प्रमुखांविरोधात उमेदवार!

  • २०१७ ची विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि सपा एकत्र लढले.
  • मात्र निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ही युती तुटली.
  • तरीही लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसने राष्ट्रीय लोकदलाचे जयंत चौधरी, तसेच मुलायम आणि अखिलेश यांच्याविरोधात उमेदवार उभा केला नव्हता.

 

दहा मार्चला कळणार जनमताचा कौल!

  • उत्तर प्रदेशात सात टप्प्यात मतदान होणार आहे.
  • पहिल्या टप्प्यात १० फेब्रुवारी, दुसऱ्या टप्प्यात १४ फेब्रुवारी, तर तिसऱ्या टप्प्यात २३ फेब्रुवारीला २० मतदार मतदान करणार आहेत.
  • उत्तर प्रदेशसह निवडणुका असलेल्या पाच राज्यांमध्ये १० मार्च रोजी निकाल जाहीर होतील.

Tags: Congresssamajwadi partyUPअखिलेश यादवउत्तर प्रदेशउत्तर प्रदेश विधानसभा निवडणूककाँग्रेससमाजवादी पक्ष
Previous Post

अंबड येथील सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम तात्काळ सुरू करावे

Next Post

महाराष्ट्रावर अन्यायाची केंद्र सरकारची परंपरा यंदाच्या अर्थसंकल्पातही कायम- उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post
ajit pawar

महाराष्ट्रावर अन्यायाची केंद्र सरकारची परंपरा यंदाच्या अर्थसंकल्पातही कायम- उपमुख्यमंत्री अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!