मुक्तपीठ टीम
दुसऱ्या लाटेचा वेग मंदावत असतानाच देशात तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी योग्य तयारीची आवश्यकता व्यक्त होत असतानाच काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी एक श्वेत पत्रिका जारी करत सरकारला आपल्या चुका सुधारण्याची मागणी केली आहे. “कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याने, त्या संकटाला तोंड देण्यासाठी आतापासूनच तयारी केली सुरु केली पाहिजे,” असे बजावतानाच सरकारला मार्ग दाखवण्यासाठीच श्वेतपत्रिका जारी केल्याचेही राहुल गांधी यांनी सांगितले आहे.
माध्यमांशी बोलताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राहुल गांधींनी निशाना साधला. ते म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला होता, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालच्या निवडणुकींच्या प्रचारात गुंतले होते.
काय म्हणाले राहुल गांधी?
• तज्ज्ञांनी कोरोनाची दुसरी लाट येणार यासंबंधीत सरकारला इशारा दिला होता, पण त्यावेळी त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.
• दुसऱ्या लाटेत ९० टक्के मृत्यू हे आरोग्य सुविधांच्या अभावामुळे झाले आहेत.
• सरकारच्या हालगर्जीपणामुळे लाखो लोकांनी प्राण गमावले, तर कोट्यवधी लोक बाधित झाले.
• आता तिसरी आणि चौथी लाट येण्याची शक्यता आहे.
• त्यामुळे या संकटावर मात करण्यासाठी आधीपासूनच तयारी करणे गरजेचे आहे.
काँग्रेसच्या श्वेतपत्रिकेत काय?
• तिसऱ्या लाटेची तयारी, दुसऱ्या लाटेतील त्रुटी आणि आर्थिक स्वरुपात मदत आणि पीडित कुटुंबियांना नुकसान भरपाई दोण्याची व्यवस्था या मुद्द्यांचा समावेश आहे.
• तिसऱ्या लाटेत सर्वसामान्यांना जास्त त्रास होऊ नये, याची काळजी घेतली जावी.
• कोरोनामुळे मरण पावलेल्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी.
एकच दिवस नाही रोजच चांगले लसीकरण व्हावे!
• कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हाच एक मार्ग सध्या उपलब्ध आहे.
• सोमवारी दिवसभरात लसीकरणावर चांगले काम झाले आहे.
• पण एकच दिवस चांगले काम होऊन उपयोग नाही.
• तर जलद गतीने जास्तीत जास्त लसीकरण झाले पाहिजे.
• तसेच लस पुरवठ्यासंबंधित केंद्र सरकारने राज्या राज्यांमध्ये भेदभाव करु नये.