Sunday, June 1, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

संतोष बांगरांना धक्का देणारा हिंगोलीत शिवसेनेतील पक्षप्रवेश! तर कोकणातून संघ परिवाराचं बंधन तोडत शिवबंधन!

August 29, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Shivsena Incoming from hingoli

मुक्तपीठ टीम

शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यानंतर शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरु झालं आहे. आजही मातोश्रीवर महत्वाच्या स्थानिक नेत्यांचे पक्षप्रवेश झालेत. कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर हे देखील शिंदे गटात सामील झाले होते. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. मात्र, संतोष बांगर यांना टक्कर देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता व्यूहरचना रचली आहे. कळमनुरीचे माजी आमदार संतोष टार्फे आणि शेतकरी नेते अजित मगर यांनी उद्धव ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. पण आजच्या प्रवेशात महत्वाचं नाव होतं ते उद्धव कदम यांचं. ते विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कोकण प्रांतात काम करतात. त्यांच्या प्रवेशामुळे आता संघ परिवारातूनही शिवसेनेत प्रवेश झाला आहे.

अनेक जिल्ह्यांमधून शिवसेनेत प्रवेश-अरविंद सावंत

  • एकीकडे मातोश्रीवर रीघ लागली आहे.
  • अनेक जिल्ह्यांमधून प्रवेश येत आहेत.
  • हिंगोली जिल्ह्यातून काही नेते पुन्हा आमच्याकडे आले आहेत.
  • यात संतोष टार्फे, अजित मगर, सुभाष वानखेडे, थोरात, पुरी आणि बजरंग दलाचा समावेश आहे.

कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी ऐनवेळी शिंदे गटात प्रवेश केल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. मात्र, आता उद्धव ठाकरे संतोष बांगर यांच्यासमोर कडवं आव्हान निर्माण करत आहेत.सोमवारी डॉ.टार्फे आणि अजित मगर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. नवनिर्वाचित असलेले सहसंपर्कप्रमुख बबनराव थोरात व माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी देखील पक्षात प्रवेश केला आहे.

संघ परिवारातून शिवसेनेत!

  • उद्धव कदम यांनी प्रवेशामागील कारण मांडलं.
  • मी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचं कोकण प्रांतात काम करतो.
  • शिवसेना हिंदुत्वाच्या आणि संयुक्त महाराष्ट्राच्या अस्मितेच्या मंदिराचा गाभा आहे.
  • शिवसेनेचं महत्त्व आणि महात्म्य टिकून राहिलं पाहिजे.
  • कारण मुंबई टिकली तर महाराष्ट्र टिकेल. महाराष्ट्र टिकला तर महाराष्ट्राची अस्मिता टिकेल.
  • आतापर्यंत आम्ही संघ बंधनात काम करत होतो, आता छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या शिवबंधनात काम करण्यास आलो आहोत.

Tags: Bajrang dalCongresshingoliShivsenaVishwa Hindu Parishadबजरंग दलविश्व हिंदू परिषदशिवसेनाहिंगोली
Previous Post

आदिवासी विद्यार्थी प्रवेशापासून वंचित, ‘जिजाऊ’ आक्रमक!

Next Post

राज्यात ८१० नवे रुग्ण, १०१२ बरे! मुंबई ३५१, नाशिक ६, नागपूर १ नवे रुग्ण !!

Next Post
राज्यात २९५६ नवे रुग्ण, २१६५ रुग्ण बरे! मुंबई १७२४, नाशिक २, नागपूर ५ नवे रुग्ण !!

राज्यात ८१० नवे रुग्ण, १०१२ बरे! मुंबई ३५१, नाशिक ६, नागपूर १ नवे रुग्ण !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!