Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“राममंदिर निधीची काँग्रेसने उठाठेव करू नये”

भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा टोला

January 31, 2021
in घडलं-बिघडलं
0
bjp-spokeperson-keshav-upadhye-slams

मुक्तपीठ टीम

 

“अयोध्येमध्ये राम मंदिर उभारण्याच्या नावाखाली भाजप आणि आरएसएस घरोघरी जाऊन रोख पैसे गोळा करत असून त्यांच्याकडून जनतेला लुबाडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्याकडून गोळा केलेला निधी ट्रस्टला पोहोचतोय की नाही याची काळजी घ्यावी”, असे आवाहन काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले होते. त्यांना प्रत्युत्तर भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एका पत्रकाद्वारे दिले आहे. “आपण देत असलेला निधी योग्य ठिकाणी पोहोचणार आहे याची खात्री आहे. त्यामुळेच सामान्यांकडून राम मंदिरासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जात आहे. मतांसाठी इंदिरा गांधी, राजीव गांधींचे अस्थिकलश गावोगावी फिरवणाऱ्या काँग्रेसने राममंदिराच्या निधीची उठाठेव करू नये, असा टोला लगावला आहे.”

 

केशव उपाध्ये यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे की, “राममंदिरासाठी सामान्य माणूसही स्वतःहून निधी देऊ लागल्याने काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांना पोटशूळ झाला आहे. त्यामुळेच निधी योग्य ठिकाणी जातोय की नाही याची चिंता काँग्रेसवाल्यांना वाटू लागली आहे. राममंदिरासाठी होत असलेले निधी संकलन पूर्णतः पारदर्शक पद्धतीने होत आहे. निधी संकलन करणारे कार्यकर्ते त्याची पावती त्वरीत निधी देणाऱ्याकडे सुपूर्त करीत आहेत. निधी संकलन करणाऱ्या संघटनांवर विश्वास असल्यानेच गोरगरिबही निधी संकलनास हातभार लावत आहेत”.

 

“ज्या काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व नॅशनल हेराल्ड गैरव्यवहार प्रकरणी जामिनावर सुटले आहेत, अशा पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्यांना सगळीकडे गैरव्यवहारच दिसत असणार. राममंदिराचा निधी नॅशनल हेराल्डप्रमाणे अन्यत्र वळविला जाणार नाही, याची सामान्य माणसाला खात्री आहे”, असेही पुढे केशव उपाध्ये यांनी पत्रकात म्हटले आहे.

 

काय म्हणाले होते काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत?

 

राम मंदिर उभारणीसाठी देशपातळीवरती राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या माध्यमातून निधी गोळा केला जात आहे परंतु या ट्रस्टबरोबरच भाजपा व आरएसएस देखील घरोघरी जाऊन रोखीने पैसे गोळा करत आहेत. भारतीय जनता पक्ष, आरएसएसची पार्श्वभूमी पाहता या माध्यमातून भाजपा-संघाकडून जनतेला लुबाडले जाण्याची मोठी शक्यता असून सदर पैसा भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या घरी किंवा भाजपाच्या पक्षनिधीसाठी वापरला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जनतेने राम मंदिर निर्मितीसाठीच आपला निधी राम मंदिर तिर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये थेट जाईल याची खबरदारी घ्यावी. आजवर भाजपा-आरएसएस मार्फत गोळा केलेला निधी सदर ट्रस्टलाच भाजपा-आरएसएसने पोहोचवला की नाही याची चौकशी राज्य सरकारने करावी, अशी मागणी करून भाजपा-संघाकडून जनतेला लुबाडले जाण्याची शक्यता आहे, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिला


Tags: BJP chief spokesperson Keshav UpadhyayCongress spokesperson Sachin Sawantकाँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंतभाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये
Previous Post

“जखम अशी सुगंधी देऊन गेलेत इलाही”

Next Post

#सरळस्पष्ट शेतकऱ्यांविरोधात फॉरवार्डेड गरळ ओकणाऱ्यांसाठी रेड अलर्ट!

Next Post
#सरळस्पष्ट शेतकऱ्यांविरोधात फॉरवार्डेड गरळ ओकणाऱ्यांसाठी रेड अलर्ट!

#सरळस्पष्ट शेतकऱ्यांविरोधात फॉरवार्डेड गरळ ओकणाऱ्यांसाठी रेड अलर्ट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!